लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त टेबल टेनिसपटू स्वस्तिका संदीप घोष हिने जम्मू येथे झालेल्या इंटर स्टेट सिनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुहेरी गटात रौप्यपदक मिळवत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर 2024मध्ये पॅरिसमध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगाने जपान देशात प्रशिक्षण घेण्यासाठी स्वस्तिकाची निवड झाली आहे. त्याबद्दल …
Read More »वारदोली येथील मारहाण प्रकरणातील आरोपींना कानपूर येथून अटक
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील वारदोली येथे एका 54 वर्षीय व्यक्तीला दगडाने मारहाण करून त्याला लोखंडी पलंगाला बांधून ठेवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा महामार्गाचे काम या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 30) केले. कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 …
Read More »मुबलक पाण्यासाठी नियोजनाची गरज
रोहा तालुक्यात पाणी प्रश्न ऐरणीवर रोहे : प्रतिनिधी उन्हाळा आला की पाणीटंचाई या विषयावर चर्चा चालू होते, परंतु भविष्यातील पाणीटंचाई बाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. मुबलक पाणीसाठा असताना तो जतन करणे, पाणी आडवणे व जिरवणे याबाबत खल होताना दिसत नाही. अशीच काहीशी परिस्थिती रोहा तालुक्यातील आहे. रोहा तालुक्यात उपलब्ध …
Read More »पेणमध्ये रस्त्याच्या निधीसाठी ग्रामस्थांचे निवेदन
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताडमाळ व तुरमाळ या आदिवासी वाड्यांना रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी 5 एप्रिलला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला असून याबाबत एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना निवेदन देण्यात आले. जिर्णे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ताडमाळ, तुरमाळ, पहिरमाळ, गुतीचीवाडी, चाफेगणी या …
Read More »विहिरींमध्ये जलपुनर्भरण करण्याची गरज
पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमुनेही आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुण्यातील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रुग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलाचा गोपनीय अहवाल सादर केला होता. त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या राजकीय प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली असल्याने ही दूषित पाणी …
Read More »दिलदार, सर्वसमावेशक गिरीशभाऊ
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या गिरीशभाऊंच्या जाण्याचे पुणे पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आणि सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनांनंतर सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. एका कंपनीतील कर्मचारी ते खासदार असा गिरीश …
Read More »वीहूर पुलाच्या रस्त्याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
मुरुड : प्रतिनिधी मुंबई मुरुड या मुख्य रस्त्याला जोडणारा वीहूर पूल अत्यंत महत्वाचा असताना सुुध्दा केवळ तीनशे मीटर रस्त्याला कार्पेट टाकण्याचा विसर बांधकाम खात्यास पडल्याने आज असंख्य प्रवासी यांना धूळ व खाच खळग्यातून प्रवास करावा लागत आहे. 2021 च्या मुसळधार पावसामुळे विहूर् पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे वाहून जाऊन येथे …
Read More »खोरा बंदरातील नवीन जेट्टीच्या बांधकामासाठी ‘सॉईल टेस्टिंग’
लवकरच कामाला सुरुवात होणार मुरुड : प्रतिनिधी खोरा बंदरात नवीन जेट्टी बनवण्यासाठी सॉईल टेस्टिंगच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. सॉईल टेस्टिंगद्वारे खोलगट भागात खडकाचे, दगडाचे व मातीचे प्रमाण काय आहे हे कळणार असून त्याद्वारे नवीन जेट्टीचे काम करणे सुलभ होणार आहे. 30 मीटर अंतरावर सॉईल टेस्टिंग करण्यात येणार आहे. असे …
Read More »कर्जतमधील गरोदर महिलेची हेळसांड
बाळ मृतावस्थेत जन्मले; आरोग्य अधिकार्यांवर कारवाईची कुटुंबियांची मागणी कर्जत : प्रतिनिधी कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या आदिवासी महिलेवर येथे उपचार न करता तिला उल्हासनगर येथे पाठवून देण्यात आले. त्यामुळे गरोदर महिलेची हेळसांड होऊन तिचे बाळ मृतावस्थेत जन्माला आले. या प्रकरणाची जबाबदारी वैद्यकीय अधिकार्यांनी झटकली आहे. दुसरीकडे दोषींवर कारवाई करावी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper