Breaking News

महत्वाच्या बातम्या

सिडको अवलंबणार ई-लिलाव पद्धत ; दुकाने, गाळे व कार्यालयांची पारदर्शक व जलद विक्री

नवी मुंबई : सिडको वृत्त सिडकोतर्फे दुकाने, गाळे व कार्यालय यांची विक्री पारदर्शक व जलद पद्धतीने व्हावी याकरिता ई-लिलाव प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीचा अवलंब करण्याकरिता सिडकोतर्फे पात्र बोलीदार, बँकांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेदरम्यान एचडीएफसी बँक यशस्वी झाली होती. नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर, नेरूळ …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पुरस्काराने सन्मानित

चौक : रामप्रहर वृत्त अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मंगळवारी (दि. 30) चौक येथील एनडी स्टुडिओत करण्यात आला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, …

Read More »

रुग्णांच्या सेवेसाठी सुविधा व व्यवस्था

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पत्रकार परिषदेत माहिती पनवेल : सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्ट रोजी आयोजित आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून, सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी आमदारकीचा राजीनामा देऊन आपापल्या पक्षाला धक्का देणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी शेकडो पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह बुधवारी (दि. 31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती अभेद्य राहणार असून, या वेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत …

Read More »

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बंगल्यावर

मुंबई : प्रतिनिधी एकामागोमाग एक नेते, आमदार सोडून चालल्यामुळे अस्वस्थ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेही भाजप प्रवेशाची चाचपणी करताहेत की काय, या चर्चेला उधाण आले …

Read More »

आध्यात्माशी जुळावे नाते

अपयशाचा, संकटांचा, ताणाचा सामना करण्यात भारतीय इतके कमी का पडताहेत असा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा एकदा विचारला जात आहे. आधी आपण निव्वळ शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबद्दल वाचत होतो. अलीकडच्या काळात आर्थिक कोंडीतून होणार्‍या आत्महत्या शहरी भागांमध्येही हलके-हलके डोके वर काढू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना तर आपण अनेक वर्षे तोंड देतोच आहोत. देशभरात …

Read More »

‘चूलमुक्त, धूरमुक्त’ होणार कोकण विभाग

भारतीय स्त्रीला धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशात उज्ज्वला योजनेच्या रूपाने मोठे अभियान राबविले जात आहे. त्याचा फायदा देशातील मोठ्या जनसमूहाला झाला. महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजना, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना व एलपीजी गॅस वितरणाच्या अन्य योजनांच्या लाभापासून जी कुटंबे वंचित राहिली आहेत, अशा कुटुंबांना गॅसजोडणी उपलब्ध करून दिली जात …

Read More »

मांसाहारावर ताव मारून गटारी साजरी

अलिबाग : प्रतिनिधी श्रावण मासाची पूर्वसंध्या म्हणजे दीप अमावस्या. तिचा अपभ्रंश गटारी अमावस्या म्हणून झाला. तिखटावर म्हणजेच मांसाहारावर ताव मारून बुधवारी (दि. 31) सर्वत्र गटारी साजरी झाली. अर्थात मानवी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी शेकडो बकरे आणि कोंबड्यांचा बळी गेला. गुरुवारी दुपारपर्यंत अमावस्या असल्याने बुधवार हा हक्काचा मांसाहाराचा वार ठरला. त्यामुळे मटणाच्या …

Read More »

दंगलींपेक्षा रस्ते अपघातात अधिक मृत्यू ः गडकरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गटांमधील हाणामारी, दंगल किंवा नक्षलवादी-दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 31) राज्यसभेत दिली. मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयाकवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे 1.5 लाख …

Read More »

गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात

मुंबई ः प्रतिनिधी भांडूपमध्ये वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याचे आव्हान कायम असताना भांडूप पोलीस ठाण्यात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याच्या व्हिडीओने पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे भांडूपकरांमध्येही नाराजीचे वातावरण होते. या प्रकरणी संबंधित पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीदरम्यान भांडूप पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित पोलिसांची नावे पोलीस उपनिरीक्षक सचिन …

Read More »