उलवे : रामप्रहर वृत्त मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांची वर्षा सहल यंदा रविवारी (दि. 28) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे येथे नेण्यात आली होती. ही सहल चांगलीच रंगली. आंतरराष्ट्रीय स्तराचे हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहून पत्रकार व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. धो-धो कोसळणारा पाऊस आणि तरण तलावात …
Read More »प्रशिक्षकपदासाठी विराटची शास्त्रींनाच पसंती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. सध्या असलेले प्रशिक्षक रवी शास्त्री हे या पदावर कायम राहणार की नवे प्रशिक्षक टीम इंडियाला लाभणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने शास्त्रींनाच आपली पसंती …
Read More »सीकेटी महाविद्यालयात माहितीदूत उपक्रमाचे आयोजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आणि युनिसेफ व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने ’युवा माहितीदूत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनेची …
Read More »पुण्याच्या पराभवाची हॅट्ट्रिक
मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पुणेरी पलटण संघाला सलग तिसर्या पराभवाला सामोरे जावे लागले. बंगाल वॉरियर्सने पुण्यावर मात केली. पुण्याचे खेळाडू या सामन्यात बंगालच्या झंझावाताचा सामनाच करू शकले नाहीत. दुसरीकडे बंगालने अष्टपैलू खेळ करीत सामन्यात बाजी मारली. पहिल्या सत्रापासून बंगाल वॉरियर्सने आक्रमक खेळ करीत सामन्यात आघाडी घेतली होती. चढाईपटू …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वावंजे आणि फणसवाडी शाळेत वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वावंजे आणि फणसवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. 30) करण्यात आले होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून मार्गदर्शन केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना …
Read More »सुगम संगीत स्पर्धेत ‘सीकेटी’च्या सुरांची मोहिनी
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबईतील विक्रोळी येथील विद्या विकास सोसायटी संचलित मटकर संगीत विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 29 जुलै या त्यांच्या स्मृतिदिनी ही स्पर्धा घेतली …
Read More »गेल वादळ घोंगावले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेन्टी-20 लीगमध्ये जोरदार फटकेबाजी करीत शतक लगावले. त्याने या वादळी खेळीत 12 षटकार व 7 चौकारांसह 54 चेंडूंत 122 धावा चोपल्या. अर्धशतक होण्यापूर्वी गेल इतका आक्रमक नव्हता. त्याने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर …
Read More »गर्भाशय कॅन्सर रोग निदान शिबिर
पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजन पनवेल ः प्रतिनिधी महापालिका क्षेत्रातील महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरचे रोग निदान शिबिर दि. 1 आणि 2 ऑगस्ट रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महिला व बाल कल्याण समिती व वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »पावसाच्या पाण्यावर तयार झालेल्या भाज्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल
खोपोली : प्रतिनिधी आदिवासी बांधव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भाज्यांची लागवड करतात. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्यामुळे माळरानावर लावलेली भाजी तयार होण्यास विलंब लागला. मात्र मागील आठवड्यापासून विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारपेठेत येऊ लागल्या आहेत. पावसाच्या पाण्यावर तयार होत असलेल्या या भाज्या खाण्यासाठी रुचकर आणि चवदार असल्याने त्या भाज्या ग्राहक आवडीने खरेदी करतात. …
Read More »‘त्या’ पर्यटकांचा शोध सुरूच
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील निगडे गावाजवळील निगडी नदीत रविवारी (दि. 28) मुंबई चुनाभट्टी येथील पर्यटक रवी चव्हाण बुडाल्याची घटना घडली होती. अद्यापही त्या बुडालेल्या तरूणांचा तपास लागला नाही. वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई चुनाभट्टी येथील नऊ पर्यटक रविवारी पर्यटनांसाठी निगडे गावाजवळील निगडी नदीकिनारी गेले होते. त्यापैकी काहीजण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper