Breaking News

महत्वाच्या बातम्या

सीकेटी इंग्रजी माध्यमाचा योग दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त : येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने शुक्रवारी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी योग शिक्षिका रश्मी रामगरीया यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रामगरीया यांचा सत्कार इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला …

Read More »

‘नेरळ-माथेरान स्थानकांचा कायापालट करणार’

कर्जत ः बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेसेवा चांगली व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. त्याचवेळी नेरळ आणि माथेरान ही दोन्ही स्थानके लोणावळा स्थानकाप्रमाणे पर्यटन रेल्वे स्थानके जाहीर केली आहेत. या स्थानकांचा कायापालट पुढील काळात पूर्ण होईल, असा आशावाद खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, लोकांची पाच वर्षे सेवा केली …

Read More »

ईटीसी कंपनीत वृक्षारोपण

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डाळ उत्पादन करणार्‍या ईटीसी कंपनीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी वावोशी विभागाचे मंडळ अधिकारी संदीप जाधव, सरपंच शैलेश मोरे, तलाठी तसेच कंपनीचे व्यवस्थापक राकेश पांडे, सुनील लोखंडे, ग्रामसेवक बी. पी. पाटील आदी उपस्थित …

Read More »

नागाची सुखरूप सुटका करण्यात सर्पमित्राला यश

मुरूड : प्रतिनिधी  मजगावातील शेतात राहणारे अनिकेत पाटील यांच्या निवासस्थानासमोरच खेकड्यांनी काढलेल्या  बिळात साडेचार फूट लांबीचा नाग लपून बसल्याने पाटील यांच्या घरातील सर्व सदस्य भयभीत झाले होते. या वेळी अनिकेत पाटील यांनी वन खात्याला फोन करून तातडीची मदत मागितली. या वेळी वन खात्याने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. नाग …

Read More »

कर्जतमधील शेतकर्यांचे लागलेत पावसाकडे डोळे

बोअरवेलचे पाणी वापरण्याची वेळ कर्जत ः प्रतिनिधी मागील 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या सरी कोसळल्यानंतर शेतकर्‍यांनी आपल्या शेतात भाताची पेरणी केली आहे, परंतु त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पेरलेले बियाणे फुकट जाण्याची वेळ कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. काही शेतकर्‍यांनी बियाणे जगविण्यासाठी शेतात …

Read More »

मराठी माणूस, त्याची भाषा आणि इतर लोक

महाराष्ट्रातील सर्व भाषिक शाळांमधून मराठी भाषा आणि साहित्य हा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मुंबईत चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात घोषित केला. महाराष्ट्राबाहेरील आणि महाराष्ट्र शासनाचे ज्यांच्या प्रशासनावर नियंत्रण नाही अशा शिक्षण संस्थांच्या शाळा महाराष्ट्रात त्यांच्या विशिष्ट विद्यार्थीवर्गासाठी विद्यादानाचे काम करीत असतात. तेथेही हा अनिवार्यतेचा नियम लागू …

Read More »

पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..!

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली नवा सूर, आनंदयात्रा मिळाली.. नैराश्येतुनी माणसे मुक्त झाली जगू लागली, हास्यगंगेत न्हाली..! – कविवर्य मंगेश पाडगावकर पुलंच्या साहित्याचा माझ्या किंवा समाजाच्या जडणघडणीवर झालेला परिणाम, पुलंच्या लिखाणाचा समाजावर काय परिणाम झाला याचे मूल्यमापन करण्याइतका काही मी मोठा नाही, परंतु माझ्या स्वत:च्या वैचारिक जडणघडणीवर पुलंच्या साहित्याचा नि:संशय परिणाम …

Read More »

पनवेल महापालिका हस्तांतरण करात बदल

पनवेलः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील हस्तांतरण करात बदल करण्यात आला असून आधीच्या कर आकारणी पद्धतीपेक्षा सरसकट कर आकारणी पद्धत लागू करण्यात आली आहे. पनवेल महापालिकच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या बदलामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर …

Read More »

रायगडातील 105 गावे धोकादायक

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा अहवाल महाड : प्रतिनिधी  पावसाळा सुरू झाला की रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुढे येतो. जिल्ह्यात अशी 105 धोकादायक गावे असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या सर्व गावांतील ग्रामस्थांना आपत्तीची कारणे व आपत्ती निवारणाबाबत प्रशिक्षण देऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली आहे. या प्रशिक्षणामुळे ग्रामस्थ …

Read More »

पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणूक काळात महानगरपालिका कर्मचारी वृंद निवडणूक कामासाठी व्यस्त असल्याने काही लोकांनी याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत चाळी बांधण्याचा सपाटा लावला होता. आता पावसाळा तोंडावर आला असताना प्रशासन कारवाई करणार नाही अशा समजुतीत चाळमाफिया असताना पालिकेने अशा बांधकामांवर हातोडा मारला आहे. पनवेल रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरातील अनधिकृत …

Read More »