नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सवर मात करून दिल्लीने प्ले-ऑफ (बाद फेरी)मध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर दिल्लीने बंगळुरूवर मात केली. या विजयासह दिल्लीची तब्बल सात वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे. 2012 साली दिल्लीचा संघ शेवटचा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला होता. गेल्या काही हंगामांमध्ये दिल्लीच्या …
Read More »कोलकाताची मुंबईवर सरशी
हार्दिक पांड्याची एकाकी झुंज अपयशी कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये रविवारी (दि. 28) मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून 34 धावांनी हार पत्करावी लागली. रसेलच्या (नाबाद 80) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे 233 धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करीत 91 धावांची खेळी केली, पण त्याची …
Read More »कोकणही तापले! पोलादपुरातील लोहारमाळमध्ये 44 अंश तापमान
पोलादपूर : प्रतिनिधी राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना कोकणातही उष्मा वाढत असून, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे रविवारी (दि. 28) 44 अंश एवढ्या तापमानाची नोंद मोबाईलमध्ये दिसून आली. सर्वसाधारणपणे राज्यात विदर्भात उष्णतेचा भडका उडालेला पाहावयास मिळतो, पण रखरखीत उन्हाच्या झळा आता कोकणातही जाणवू लागल्या आहेत. रविवारी दुपारी दोन ते …
Read More »शेकापच्या कार्यकर्त्याला पुन्हा पैसे वाटताना पकडले; सुकापूरमधील घटना; पोलिसांत गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार कामोठ्यात मतदारांना पैसे वाटप करताना शेकाप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी (दि. 28) सुकापूरमध्येही असाच प्रकार घडला. याप्रकरणी प्रताप रामचंद्र आरेकर या शेकाप कार्यकर्त्याला अटक करून त्याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मतदान …
Read More »चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान ; मावळमध्ये 12,659 अधिकारी-कर्मचारी सज्ज
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. 29) नऊ राज्यांतील 71 जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 17 जागांचा समावेश असून, सर्वांचे लक्ष मावळ मतदारसंघाकडे लागले आहे. मावळमधील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी 12 हजार 659 अधिकारी व कर्मचार्यांची मतदान प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या मावळ …
Read More »आता राष्ट्रवादीच्या नेत्याने उधळली मुक्ताफळे; म्हणे स्वातंत्र्यलढ्यात जिनांचे मोठे योगदान!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांवर स्तुतिसुमने उधळल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन यांनीही जिनांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. भारताच्या स्वातंत्र्यात आणि प्रगतीत काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरूंपासून मोहम्मद अली जिना यांचे योगदान असल्यामुळे …
Read More »भाजपच्या ताकदीच्या जोरावर गीते विजयी होणार!
अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचा विश्वास मुरूड : प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीची कोकणात ताकद वाढली असून केंद्र व राज्य शासनाच्या कामावर लोकांचा विश्वास वृद्धिंगत झालेला आहे.विद्यमान सरकारने लोकांच्या विकासाच्या योजनांना प्राधान्य देत मूलभूत सुविधा लोकांना जास्तीत जास्त मिळाव्यात यासाठी कोकणातील विकासाला सुद्धा चालना दिली आहे. कोकणातील लोक …
Read More »नवी मुंबईकर ओलांडणार उच्च मतदानाचा टप्पा?
नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 29) पार पडत आहे. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. यात ठाणे, मीरा-भाईंदरसोबत नवी मुंबईतदेखील मतदान होणार आहे. कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांत घटलेल्या मतदानाच्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना चिंतेत टाकले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जागरूक मतदार मतदानाचा टक्का …
Read More »दुर्गम केंद्रांवरही पोहचले मतदान कर्मचारी
कर्जत ः बातमीदार मावळ मतदारसंघात होणार्या मतदानासाठी रायगड जिल्ह्यातून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रुजू होत आहेत, मात्र कर्जत तालुक्यातील दूरवरील आणि दुर्गम भागातील मतदान केंद्रांवरही परिश्रमपूर्वक सर्व साहित्य घेऊन पोहचलेल्या कर्मचार्यांचे कौतुक होत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वत: डोंगराळ भागात जाणार्या या पथकाशी सातत्याने …
Read More »कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी लढत -विजय नाहटा
नवी मुंबई : बातमीदार ठाणे लोकसभा मतदारसंघात होणारी लढत ही कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी असून, राजन विचारे हे चार लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला, तर गद्दार आनंद परांजपे यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही त्यांनी केली. ते वाशी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper