पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष आणि रिद्धी रिंकल सामाजिक विकास मंडळ सुकापूर यांच्या वतीने कला, संस्कृती महोत्सव 2019चे आयोजन बुधवारी (दि. 13) करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या महोत्सवात हळदीकुंकू, खेळ रंगला …
Read More »धार्मिक सभा उत्साहात
नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ येथील श्री शनिश्वर सेवा समितीच्या वतीने शनिमंदिरात महापूजा, भव्य रथोत्सव आणि धार्मिक सभेचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या सभेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. सर्व धार्मिक श्रद्धाळू शनिमंदिरात …
Read More »सिडको गृहनिर्माण योजनेंतर्गत सोडत उत्साहात
नवी मुंबई : सिडको गृहनिर्माण योजना 2019मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या 1,100 सदनिकांसाठीची संगणकीय सोडत गुरुवारी सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवनातील सभागृहात काढण्यात आली.
Read More »पनवेल मनपा सत्ताधार्यांच्या मध्यस्थीमुळे दिव्यांगांना निधीचे वाटप होणार
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेकडून दिव्यांगांना निधी वाटप करण्यास उशीर होत असल्याने दिव्यांगांनी आंदोलन पुकारले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी पक्षाने अधिकार्यांशी चर्चा केल्यावर प्रशासनाने लेखी पत्र देत दिव्यांगांना 50 टक्के रक्कम वाटप करण्यात येईल, असे सांगितले. पनवेल महापालिका हद्दीत जवळपास एक हजारहून अधिक दिव्यांग नागरिक आहेत. त्यांना …
Read More »खोपोलीत बालिकेची हत्या करणारा आरोपी गजाआड
खोपोली : प्रतिनिधी येथील रहिवाशी भागातील चार वर्षांच्या बालिकेची क्रूरपणे हत्या करणार्या आरोपीस पोलिसांनी वेगाने तपासाची यंत्रणा राबवून गजाआड केले आहे. याप्रकरणी शेजारीच राहणार्या 27 वर्षीय तरुणास अटक केली आहे. आरोपीला बालिकेच्या आईशी अनैतिक संबंध प्रस्थापित करावयाचे होते व त्याने यापूर्वी तसे प्रयत्नही केले होते, मात्र मुलीच्या आईने त्यास कडाडून …
Read More »सुकापूरमध्ये रस्ते काँक्रिटीकरण
शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे सातत्याने होत आहेत. त्या अंतर्गत सुकापूर येथील शिलोत्तर रायचूर या परिसरात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात सरकार जागरूक केंद्रीय रसायन मंत्री डी. बी. सदानंद गौडा यांचे प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात सरकार जागरूक असून, रसायनीतील एलएलआयएन प्रकल्प आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रकल्प ठरेल, असा विश्वास केंद्रीय रसायन मंत्री डी. बी. सदानंद गौडा यांनी गुरुवारी (दि. 14) व्यक्त केला. रसायनीस्थित एचआयएल कंपनीत अद्ययावत मच्छरदाणी तयार करण्याचा अर्थात एलएलआयएन प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाचे भूमिपूजन ना. …
Read More »पनवेल पाणीपुरवठा आराखड्याला शासनाचा हिरवा कंदील
173.27 कोटींच्या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या 173.27 कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या योजनेचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. …
Read More »मासळीची आवक घटल्याने कोळी समाज चिंतेत
मुरूड : प्रतिनिधी मागील दोन महिन्यांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनाशी झाली आहे. पाच-सहा दिवस वस्ती करूनही पुरेशी मासळी मिळत नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागात मच्छीमारी होड्या किनार्याला साकारलेल्या दिसत आहेत. मुरूड तालुक्यात 650 होड्या आहेत. त्यातील आगरदांडा, दिघी, मुरूड, राजपुरी आदी भागातील बहुतांशी होड्या किनार्यावर आहेत. हवामानातील बदलामुळे समुद्रातील मासळी …
Read More »कर्जतमध्ये 23 सदस्य बिनविरोध
थेट सरपंच पदासाठी 19; तर 59 सदस्यांसाठी 126 उमेदवार रिंगणात कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 24 फेब्रुवारी रोजी होत आहेत. त्यासाठी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सदस्यांसाठी 165, तर सरपंच पदासाठीचे 27 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता थेट सरपंच पदाच्या आठ जागांसाठी 19 उमेदवार, …
Read More »