Breaking News

महत्वाच्या बातम्या

वलपमधील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन अनेक जण या पक्षात प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे भाजपची विकासकामे पाहून शेकापच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 10) पक्षप्रवेश केला. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पनवेल मालधक्का येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या …

Read More »

आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उमरोली पुलाचे भूमिपूजन

पनवेल : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास अपेक्षित आहे. त्यांच्या सबका साथ, सबका विकास, या ध्येय धोरणाप्रमाणे पनवेल तालुक्यातील उमरोलीकरांची अनेक वर्षांची मागणी असलेल्या पुलाचे रविवारी (दि. 10) सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पनवेल-माथेरान रस्त्यावर असलेल्या उमरोली गावात …

Read More »

पोपटाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते

मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची खिल्ली मुंबई : प्रतिनिधी पोपटाच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते. ते भाषणाची सुपारी घेतात. त्यामुळे त्यांच्या भाषणाने विचलित होऊ नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे असून, त्यांच्याकडे पाहून थुंकल्यास ते आपल्यावरच पडते, अशी …

Read More »

लोकसभा महासंग्रामाचा बिगुल वाजला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये राजकीय महासंग्राम रंगणार असून, त्याचा एकत्रित निकाल 23 मे रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. लोकसभेसह आंध्र प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी, तसेच …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा धावांचा डोंगर

मोहाली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने शिखर धवनचे शानदार शतक (143 धावा) आणि रोहित शर्माचे अर्धशतक (95) यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर डावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 358 धावा केल्या. धमाकेदार सुरुवात करणार्‍या भारतीय जोडीने भारताला दीड शतकी सलामी मिळवून …

Read More »

आमदार सुरेश लाड यांच्या सभेत महिलांचा संताप ; हाळ गावच्या पाणी प्रश्नावरून गोंधळ

खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील हाळ गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात हाळ गावच्या महिलांनी पाणी प्रश्नावरून आमदार सुरेश लाड यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने महिलांच्या दोन्ही गटांत शाब्दिक युद्ध रंगले. त्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली.   खोपोली नगरपालिकेच्या वतीने शहराच्या विविध प्रभागांत विविध विकासकामांचे उद्घाटन स्थानिक आमदार सुरेश …

Read More »

रक्त तपासणी अहवाल चुकीचा; अंबानी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा

खोपोली : प्रतिनिधी रक्त तपासणी अहवाल चुकीचा दिल्याने एकनाथ दगङू सांगळे (49, रा. लोधीवली खालापूर) यांनी लोधीवली येथील धीरूभाई अंबानी रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने एकच खळबळ माजली आहे. एकनाथ सांगळे हे 24 जुलै 2017 रोजी धीरूभाई अंबानी रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या वार्ङबॉय महेंद्र …

Read More »

‘विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा’; म्हसळा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन

म्हसळा : प्रतिनिधी महिलांनी सर्व क्षेत्रांत स्वतःला सिद्ध केलं आहे. गाव विकास प्रक्रियेतही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने आयोजित केलेल्या महिला दिनानिमित्त पोषण आहार सप्ताह कार्यक्रमात मत व्यक्त करताना केले. महिलांसाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध विषयांच्या …

Read More »

प्रामाणिक रिक्षाचालकाचे पनवेल शहर पोलिसांनी केले कौतुक

पनवेल : वार्ताहर रिक्षात विसरलेली बॅग जशीच्या तशी प्रवाशाला परत करणार्‍या प्रामाणिक रिक्षाचालकाचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण व सहकार्‍यांनी कौतुक करून त्याचा विशेष सत्कार केला आहे. न्यू पनवेल ते ओरियन मॉल पनवेल या प्रवासादरम्यान प्रवासी महिलेची रिक्षात विसरलेली बॅग व त्यामध्ये मौल्यवान दागिने, पैसे, मोबाईल एटीएम …

Read More »

राज्यस्तरीय महिला दिनात डॉ. शुभदा नील यांचे व्याख्यान

पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेतर्फे ठाणे येथे विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात कर्करोग तपासणी मोहीम आणि शिबिर आयोजित करण्यात आले होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात वेलनेस ऑफ वूमन-एक पाऊल कॅन्सरमुक्तीसाठी फोग्सी व ब्रह्माकुमारीज उपक्रमाच्या राष्ट्रीय …

Read More »