Breaking News

महत्वाच्या बातम्या

राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम!

3 जागा द्या, अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार सज्ज पुणे ः प्रतिनिधी : आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागावाटपाची तयारी नाही. आघाडीने आम्हाला तीन जागा सोडाव्यात, अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी …

Read More »

शाळकरी मुले सोशल साईट्सच्या विळख्यात

नवी मुंबई : प्रतिनिधी सोशल मीडियातील विविध माध्यमे मानवाला वास्तविक जगापासून दूर घेऊन जात आहेत. याच्या वापराने लोक भ्रामक विश्वात राहण्यावर विश्वास ठेवत आहेत, परंतु या समस्येवर योग्य निदान शोधण्याकडे कोणाचे लक्ष नाही. युवकांसोबत शाळकरी मुलेसुद्धा या भ्रामक जगात गुंग होत आहेत. समाजाच्या दृष्टीने ही चांगली लक्षणे नाहीत, असे निरामय …

Read More »

विवाहितेचा विनयभंग करणारा अटकेत

पनवेल : बातमीदार पेण तालुक्यातील एका विवाहितेला रस्त्यात अडवून तिला दमदाटी करीत, तसेच तिचा हात पकडून विनयभंग करणार्‍याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पेण तालुक्यातील एक महिला दररोज पनवेल ते पेण असे ये-जा करीत असते. तिचा उलवे येथील बामणडोंगरी येथे राहाणारा गौतम कृष्णा कदम (38) हा पाठलाग करीत असे. …

Read More »

चिर्ले येथे रंगले पोपटी कविसंमेलन

चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले येथील इतिहास संशोधक तथा काव्यदरबार मंडळाचे अध्यक्ष के. एम. मढवी त्यांच्या निवासस्थानी पोपटी कविसंमेलन रंगले. या वेळी काव्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ जांभळे यांनी, सगुण साकार ईश्वराची उपासना आपण करतो तशी साहित्याची साधना करा. साहित्याला स्थळ काळाची मर्यादा नसते; तर शब्दभावना महत्त्वाच्या …

Read More »

महिलांनी लुटला फॅशन शोचा आनंद

खांदा कॉलनी : बातमीदार नवीन पनवेलजवळील आदई येथील भव्य अशा अष्टविनायक गृहसंकुलामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सादर केलेला फॅशन शो हे प्रमुख आकर्षण ठरले. या वेळी महिलांनी विविध प्रांतातील वेषभूषा आणि रंगमंचावरील पदविन्यासाने रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. प्रसिद्ध फॅशन केरिओग्राफर …

Read More »

आदिवासी महिलांना रोजगाराची भेट

पनवेल : वार्ताहर सिटीझन्स् युनिटी फोरम अर्थात कफ संस्थेने ज्या ठिकाणी वृक्षलागवड केली त्या फणसवाडी येथील आदिवासी महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला. त्यासाठी पेपर डिश बनवायचे मशिन फणसवाडी येथे बसवून दिले. पाले बुद्रुक गावचे सरपंच सचिन तांडेल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘कफ’तर्फे …

Read More »

वाहनचोराला अटक; 11 दुचाकी हस्तगत

पनवेल : वार्ताहर डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने मोटरसायकल चोरणार्‍या तरुणाला वाहन चोरी प्रतिबंधक युनिटने अटक केली आहे. नदिम युसूफ शेख (30) असे या चोरट्याचे नाव असून, त्याने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबईच्या विविध भागातून दोन लाख 30 हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ही सर्व वाहने …

Read More »

‘रोटरी’तर्फे महिलांचा सन्मान

पनवेल : प्रतिनिधी महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान स्त्रीशक्तीचा या अंतर्गत रोटरी महिला सन्मान पुरस्कार 2019 वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात समाजात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रांतील एकूण 24 महिलांचा गौरव …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे महिला दिन

पनवेल : बातमीदार : बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या संपूर्ण शाखांमधून मोठ्या उत्साहाने जागतिक महिला दिन साजरा केला. याच अनुषंगाने नवीन पनवेल शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा मोरे, जादूगार पी. बी. हांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख, नवीन पनवेल …

Read More »

‘रंगनिल संध्या’ने पनवेलकर मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त : स्थानिक कलाकारांसाठी पर्वणी असलेल्या ‘रंगनिल संध्या’ हा कलाविष्काराचा सोहळा शनिवारी (दि. 9) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात रंगला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रंगनिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने पनवेलकर मंत्रमुग्ध झाले. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »