Breaking News

महत्वाच्या बातम्या

यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यांत होणार्‍या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. …

Read More »

चारित्र्याच्या पावत्या सुपारीबाजाने देऊ नये

प्रकाश बिनेदार यांनी काढली कांतीच्या अब्रूची लक्तरे पनवेल : रामप्रहर वृत्त बेताल वक्तव्य आणि बेताल वागणुकीचा नमुना असलेल्या सुपारीबाजाने आपल्या चारित्र्याच्या पावत्या देणे म्हणजेच गाढवाने स्वतःला रंग लावून झेब्रा असल्याचे लोकांना दाखविण्यासारखेच आहे.सुरुवातीला अनिरुद्ध बापूंचा शिष्य म्हणून मिरवणार्‍या सुपारी मास्टरने वर्तमानपत्राच्या माध्यमातून घाणेरडा कारभार केल्यामुळे बापूंनी त्याला लाथ मारून हाकलले, …

Read More »

चिपळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप युतीचे चार उमेदवार बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप युतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. चिपळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 24 मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजप युतीचे मंगेश पंढरीनाथ फडके, मीनाक्षी राजेंद्र फडके, रंजना रमेश पाटील, जयश्री गणेश म्हसकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात विरोधी …

Read More »

महाड एमआयडीसीत वायूगळतीने घबराट

महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक वसाहतीमधील पॅनोरमा केमिकल या डीस्टीलेशनचे काम करणार्‍या छोट्या कारखान्यातून बुधवारी (दि. 13) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वायूगळती झाली. यामुळे या परिसरात दाट धुकेसदृश वातावरण निर्माण झाले. सुमारे दोन तासांनी ही वायूगळती आटोक्यात आणली. या कंपनीतून कर्मचारी बाहेर पळून गेल्याने कंपनीत माहिती देण्यास कोणीच उपस्थित न …

Read More »

मुंबईत पादचारी पूल कोसळला; पाच मृत्यूमुखी

सीएसएमटीनजीक दुर्घटना, 38 जखमी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण भागच खाली कोसळल्याने त्यात पाचजणांचा मृत्यू झाला असून,त्यात जीटी रुग्णालयातील दोन नर्सचा समावेश आहे. या दुर्घटनेत 38 जण जखमी झाले आहेत. शिवाय पुलाच्या …

Read More »

मावळ, माढा उमेदवारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा सस्पेन्स

पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, तटकरे, उदयनराजे मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (दि.14) राष्ट्रवादीनेही पहिली यादी जाहीर केली, मात्र या यादीत माढा आणि मावळ या दोन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा न करता सस्पेन्स कायम ठेवला आहे. जाहीर झालेल्यांमध्ये सुप्रिया सुळे (बारामती), …

Read More »

पासपोर्ट कार्यालय सुुरू झाल्याने नागरिकांना दिलासा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नवी मुंबईकरांची होणारी पायपीट यापुढे थांबणार आहे. गेली अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांना या कार्यालयाची प्रतीक्षा होती. शहरातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक प्रक्रियेकरिता ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. यामध्ये त्यांचा …

Read More »

कोकण ज्ञानपीठाचा पदवीदान सोहळा उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी : हल्लीच्या युगात नुसती पदवी घेऊन फायदा नाही. पदवीनंतर विविध क्षेत्राचा सखोल अभ्यास करून निवडलेल्या क्षेत्राचे शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन सनवेज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापक नितीन पाटील यांनी कर्जत येथे केले. कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या कर्जत येथील अभियांत्रिकी  आणि  फार्मसी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा नुकताच सेमिनार …

Read More »

उपासमारीने महाडमध्ये मगरीचा मृत्यू?

महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील कोल गावाजवळ बुधवारी (दि. 13) दुपारी पाण्याच्या डबक्यात एक मगर मृतावस्थेत आढळली. नदी आणि साचलेले पाणी कमी होऊ लागल्याने आणि याठिकाणी खाण्याचे स्रोत कमी झाल्याने भूकबळीमुळे या मगरीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. मात्र कोणत्यातरी अज्ञात कारणाने किंवा नैसर्गिक कारणास्तव गेल्या …

Read More »

बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह 12 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सांसद आदर्श बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम जोमाने वाजू लागले असून, 24 मार्च रोजी होऊ घातलेल्या या बांधपाडा ग्रामपंचायत निवडणुकीची छाननी प्रक्रिया उरण तहसील येथे पार पाडण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी थेट सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने या पदासाठी एकूण पाच …

Read More »