मुंबईच्या आसपासच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोरणांचा अधिक चांगला समन्वय व अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्य सरकारकडून हे प्रशासकीय मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. मुळातच वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यास मुंबईचा भुप्रदेश अपुरा पडू लागल्यावर आसपासच्या परिसराचा विकास नियोजनपूर्वक करण्याकरिताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. मुंबई आणि आसपासचा परिसर …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
दिघाटी (ता. पनवेल) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सरपंच अमित पाटील, शिवसेना शाखाप्रमुख कमलाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्मिता ठाकूर, शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मण ठाकूर, भाजप कार्यकर्ता राजेश ठाकूर, नारायण ठाकूर, भाजप बुथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर, नरेंद्र पाटील, संगम गावंड, मयूर ठाकूर, …
Read More »105 वर्षीय वृद्धावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
पनवेल : बातमीदार पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमध्ये बिहारमधील 105 वर्षीय व्यक्तीवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. इतक्या वर्षांच्या वयोवृद्धावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणे ही बाब दुर्मिळ असून, ती घटना पहिलीच असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिहारमधील पाटणा विधानसभा मतदारसंघातून 1962 आणि 1967मध्ये आमदार झालेले बद्री राम महारा त्यांच्या पणतूसोबत …
Read More »कारच्या धडकेत तिघे जखमी
पनवेल : बातमीदार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका भरधाव कारने दुसर्या कारला दिलेल्या धडकेत आरोपीसह अन्य दोघे जखमी झाले आहेत. अतुल प्रदीप एप्तवाल (22, हरियाना), अकुलसिंग धर्मेंद्र सिंग गोत खुब्बड (18, हरियाना) अशी जखमींची नावे आहेत. यात चालक अमन चौधरीही जखमी झाले आहेत.अमन हरदीपसिंग चौधरी हा आपली ब्रिजा कार (एचआर 85-8761) …
Read More »पनवेलमध्ये नाट्य स्पर्धा
पनवेल : बातमीदार येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नाट्य स्पर्धा आयोजित करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या स्पर्धात्मक कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले, नाट्य स्पर्धेच्या परीक्षक प्रा. संगीता जाधव, प्रमुख अतिथी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे, प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर, प्रा. डॉ. सुनीता …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये शिवरायांना अभिवादन
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 19) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर, जी. सी. गोडगे, ज्युनिअर विभाग प्रमुख व्ही. के. कुटे, तांत्रिक विभागप्रमुख आर. बी. गिर्हे, …
Read More »अध्यापक महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ
पनवेल : वार्ताहर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नुकताच पदवीप्रदान समारंभ झाला. या वेळी बीएड् आणि एमएड्च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चंद्रकांत मढवी आणि अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमा भोसले उपस्थित होते. प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनीता लोंढे यांनी पाहुण्यांची ओळख करून …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने वाटचाल
नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे उद्गार; बौद्धजन पं. स.तर्फे हृद्य सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून चालत असल्यामुळे मी माझ्या जीवनात चांगल्या प्रकारे यश मिळवित गेलो, जनमानसात प्रतिष्ठा उमटवित गेलो आणि अधिकाराच्या पदावर जाऊन बसलो. ही सर्व किमया महामानव डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने मिळाली, जे …
Read More »शांतता… परीक्षा चालू आहे!
फेब्रुवारी-मार्च महिना उजाडला की सर्वत्र परीक्षेचे वारे वाहायला लागते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी-बारावीच्या परीक्षेने दिनांक 22 फेब्रुवारीपासून परीक्षा सत्राला सुरुवात झाली आहे. ज्यांच्या घरात दहावी किंवा बारावीच्या वर्गात शिकणारी मुले असतात त्यांच्या घरात कमालीची शांतता दिसून येते. आपल्या मुलांना अभ्यास करताना कसलाच त्रास नको म्हणून …
Read More »आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब; रायगडात खळबळ
रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा येथे एका एसटी बसमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्जतवरून वस्तीची बस बुधवारी (दि. 20) रात्री 10च्या सुमारास आपटा थांब्यावर आल्यावर वाहक-चालकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग अलिबाग येथील बॉम्बशोधक पथक येऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper