जेएनपीटी : प्रतिनिधी दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून महिलांना गंडा घालणारी टोळी उरणमध्ये सक्रिय झाली आहे. सारडे येथे अशा प्रकारे फसवणूक करणार्या दोघांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे पप्पू कुमार पासवान आणि अनंत कुमार साहा (दोघेही रा. बिहार) अशी आहेत.उरण तालुक्यातील सारडे गावातील पुष्पलता राजेश …
Read More »हस्तांतरण शुल्क दरास सिडकोची मंजुरी
नवी मुंबई : प्रतिनिधी सिडको महामंडळाच्या वसाहत विभागातर्फे विविध प्रकारच्या मालमत्तांच्या हस्तांतरणाकरिता आकारण्यात येणारे शुल्क दर 1 एप्रिल, 2019 ते 31 मार्च, 2022 या कालावधीकरिता निश्चित करण्यात आले आहेत. त्यास सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या ठरावामध्ये आधीच्या वर्षीचा दर लक्षात घेऊन पुढील वर्षासाठी हस्तांतरण शुल्क दर ठरविण्याची …
Read More »विकी पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे नुकतेच आयोजन
उरण : द्रोणागिरी नोड येथे विकी पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांना अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी आरफान शेख यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे …
Read More »जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी व्हा
अरुणशेठ भगत यांचे प्रतिपादन गव्हाण ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये इ. 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेबरोबरच जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा अरुणशेठ भगत …
Read More »अरे देवा, जलसृष्टीला धोका
गेल्या 20 वर्षांत जगभरातच पाणीसाठ्यांमध्ये वाहून आलेल्या औषधी द्रव्यांचे प्रमाण वाढले आहे. सिप्रोफ्लॉक्सासिनसारख्या प्रतिजैविकांचा अंश तर परिस्थितीकीला (इकॉलॉजी अर्थात पर्यावरणातील जैविक परस्परसंबंध) बाधा आणण्याइतपत वाढल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. याबाबत नेदरलॅण्डस्मधील रॅडबाउड विद्यापीठातील पर्यावरणतज्ज्ञांनी संशोधन केले आहे. जागतिक पातळीवर दोन विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या अंशांमुळे ताज्या पाण्याचे स्रोत कसे धोक्यात आले …
Read More »निवडणुका मुक्त, निर्भय वातावरणात
आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, शांततापूर्ण, निर्भय वातावरणात आणि पारदर्शक, तसेच सर्वसमावेशक पद्धतीने पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यासह राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार, भारत निवडणूक …
Read More »एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ
पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 विमानांनी एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर कारवाई केली. या कारवाईत 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 40 वर्षांच्या सेवेत धनोआ यांनी विविध विभागांची जबाबदारी कौशल्यपूर्वक सांभाळली आहे. या …
Read More »मराठी साहित्यात स्त्रियांचे विविधांगी लिखाण
मराठी साहित्याच्या इतिहासात स्त्री संतकवींनी काही प्रमाणात आपले योगदान दिलेले दिसून येते, परंतु गेल्या शतकभरात स्त्रियांनी साहित्यविश्वात मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्त या सर्व स्त्री लेखिकांच्या कार्याचा घेतलेला आढावा… गेल्या काही वर्षांत साहित्यविश्वात अनेक नवनवीन लेखक-लेखिका उदयास आल्या. साहित्यक्षेत्राच्या क्षितिजावर नवीन तारे-तारका चमकताना दिसतात. शिक्षणाचा …
Read More »पिसाळलेला पाकिस्तान
भारतीय हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच पिसाळलेला आहे.त्यामुळेच सीमेवर भारतीय हद्दीत घुसखोरी करून गोळीबार करण्याबरोबरच लढाऊ विमाने सोडण्याचा सपाटा पाकने सुरू केला आहे, पण त्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत असून, पाकने अशाच कारवाया सुरू ठेवल्या, तर त्याचे तीव्र पडसाद सीमेवर उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई …
Read More »भारतीय खेळाडूंचा वायुसेनेला सलाम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईचे देशभरातून कौतुक होते आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनीही भारतीय हवाई दलाला सलाम केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने, आम्ही (भारतीय) चांगले वागतो म्हणून आम्हाला कमकुवत समजू नका, असा इशारा ट्विट करून दिला आहे, तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper