माजी सरपंच, उपसरपंच, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला करंजाडेमध्ये मोठा धक्का बसला आहे. शेकापचे माजी सरपंच बळीराम म्हात्रे आणि माजी उपसरपंच आशा म्हात्रे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »राजे शिवराय प्रतिष्ठानचा दुर्गदर्शन सोहळा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल येथे सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून या दुर्गदर्शन सोहळ्याचे उद्घाटन रविवारी (दि. 23) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून हिंदू राष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष …
Read More »सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेलमध्ये ‘दिवाळी पहाट’ सजली; हजारो श्रोत्यांची उपस्थिती
पनवेल (हरेश साठे) दीपावलीची पहाट, त्यातच थंडीचा गारवा आणि त्यामध्ये सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेलमध्ये दिवाळीची पहाट सजली होती. निमित्त होते ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त …
Read More »जांभिवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता कोंडीलकर
मान्यवरांकडून अभिनंदन! पनवेल : रामप्रहर वृत्त जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीकडून वेदीका विनोद जाईलकर …
Read More »विविध दिवाळी अंकांचे प्रकाशन
धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्या अनुषंगाने यंदाचा रायगड शिव सम्राट दिवाळी अंक आरोग्य विषयक असून त्याचा फायदा वाचकांना होईल, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. पनवेल येथून प्रकाशित होणार्या …
Read More »राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी शिवरायचरणी
खेळाडूंचा किल्ले रायगडावर मानाचा मुजरा अलिबाग : प्रतिनिधी जिद्द, आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर 36व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील गुणवंत युवा खेळाडूंनी सोनेरी यश संपादन केले. 140 विक्रमी पदकांची कमाई करीत महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. मिळालेली बहुमानाची ट्रॉफी घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने धनत्रयोदशीच्या दिवशी रायगड किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा केला. …
Read More »नेरळ-माथेरानदरम्यान पुन्हा धावली मिनीट्रेन!
स्थानिकांकडून जल्लोषात स्वागत माथेरान : रामप्रहर वृत्त पर्यटनाचा दिवाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी नेरळ-माथेरान मिनीट्रेन शनिवारी (दि. 22) तब्बल तीन वर्षांनंतर धावली. माथेरान स्थानकात या गाडीचे माथेरानकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. 2019मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरानदरम्यानच्या डोंगर भागातून जाणार्या मिनीट्रेनच्या रूळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे खाडीसह रूळही वाहून …
Read More »टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत-पाक महामुकाबला
मेलबर्न : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 23) लढत होणार आहे. चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी मानली जात आहे. सुपर 12 फेरीसाठी भारत आणि पाकिस्तान संघ थेट पात्र ठरले असून त्यांचा दुसर्या गटात समावेश आहे. यापूर्वी उभय संघ विश्वचषक स्पर्धेत एकूण 13 …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे 22वी राज्य आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा
प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; बक्षिसांच्या रकमेत वाढ पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 22वी राज्यस्तरीय …
Read More »सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्याबाबत ठराविक मुदतीत उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : प्रतिनिधी सिडको वसाहतींमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठोस उपाययोजना ठराविक मुदतीत कराव्यात; अन्यथा आमचे सरकार असले तरी आम्ही आंदोलन करू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 21) सिडकोच्या बैठकीत दिला. दिवाळीत गरज असेल तिथे सिडकोने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper