नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सन्नी उर्फ डाकू विकास तरे (25) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. या दोघांनी नवी मुंबईच्या विविध भागांतून चार मोटरसायकल व सहा मोबाइल फोन चोरल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलीस …
Read More »तब्बल 36 ठिकाणी मृत्यूचा सापळा
नवी मुंबई वाहतूक विभागाने शोधले अपघातप्रवण क्षेत्र नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणार्या अपघातांमधील मृतांची संख्या अधिक असल्याने नवी मुंबई वाहतूक विभागाने वाढते अपघात रोखण्यासाठी 36 अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) शोधले आहेत. या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना तीन महिन्यांपूर्वीच नवी मुंबई वाहतूक विभागाच्या …
Read More »भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन
पनवेल : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले असून देशभर चालणाऱ्या या उपक्रमात रायगड जिल्ह्याचा वाटा महत्वाचा असेल, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच महिला मोर्च्याच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि …
Read More »माथेरानची माहिती आता एका स्कॅनवर!
नगर परिषदेकडून अॅप विकसित कर संकलनासह पर्यटनाला चालना कर्जत : बातमीदार माथेरानला आलेल्या पर्यटकांची फसवणूक होते असे सातत्याने बोलले जाते. त्यात पर्यटक प्रवासी कर भरण्यासाठी आल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास दलाल आणि गाईड यांच्यात अडकून बसतो. तसे होऊ नये आणि पर्यटकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी सहजपणे जाता यावे यासाठी माहिती देणारे अॅप …
Read More »पनवेलकरांना घडणार लालबागचा राजाचे दर्शन
महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचा गौरा गणेशोत्सव पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलकरांना लालबागचा राजाचे दर्शन होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या श्री गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागचा राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये येत्या मंगळवारी (दि. 13) विराजमान केली जाणार आहे. संघटनेचे गौरा गणेशोत्सवाचे यंदा 30वे वर्ष आहे. पनवेलमधील महात्मा …
Read More »पनवेलमध्ये गणेश विसर्जनावेळी शॉक लागून 11 जण जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील कोळीवाडा विसर्जन घाटावर शुक्रवारी (दि. 10) रात्री लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असताना 11 जणांना विजेचा शॉक लागला. जखमींना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य नेते तसेच पोलिसांनी व महापालिकेच्या अधिकार्यांनी रुग्णालयात …
Read More »राहुलबाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघालेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी हल्लाबोल केला आहे. राहुलबाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत, असे म्हणत गृहमंत्री शाहा यांनी टीका केली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा …
Read More »भरपावसात गणरायाला निरोप..!
अलिबाग : प्रतिनिधी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत लाडक्या गणपती बाप्पाला सर्वत्र भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी वरुणराजाने हजेरी लावली होती. तरीही गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव जल्लोषात झाला. 10 दिवस गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. …
Read More »राज्यातील शेतकर्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून खुशखबर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकर्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील पात्र शेतकर्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविली …
Read More »‘लम्पी’चा प्रादूर्भाव रोखण्याकरिता सतर्कता बाळगावी
सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कोकरे यांचे पशुपालकांना आवाहन पाली : प्रतिनिधी गाई, म्हशीमध्ये होणार्या लम्पी स्कीन या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता पशुपालकांनी काळजी घ्यावी व सतर्कता बाळगावी, असे आवाहन सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी केले आहे. जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper