परेश ठाकूर यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 21 येथे नव्याने नादभ्रम्ह इडली हे हॉटेल सुरू झाले आहे. हे हॉटेल प्रतिक शिंदे व प्रम शिंदे यांनी सुरु केलं असून या नादभ्रम्ह इडली या हॉटेलचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 21) …
Read More »पनवेलमध्ये मुंबई अनुव्रत समितीचा संघटन दौरा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई अनुव्रत समिती तर्फे रायगड विभागाच्या प्रचार प्रवासाचा संघटन दौर्याचा कार्यक्रम मुंबई अध्यक्ष कांचन सोनी, मंत्री वनिताजी बाफना यांच्या अध्यक्षतेखाली पनवेलमधील तेरापंथ भवन रविवारी (दि. 21) झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत …
Read More »खारघरमधील गणेश मंदिराचा कळसरोहण सोहळा
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त खारघर, हाईड पार्क सोसायटी मधील गणेश मंदिराच्या कळस रोहणाचा भव्य कार्यक्रम सोहळा पार्कच्या रहिवाश्यांनी विधीवत जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. सकाळी पंचांग पूजन, होम हवन आणि कळस पूजन करण्यात आले आणि …
Read More »गणेशोत्सवात नियम भंग करणार्यांवर कारवाई
सहाय्यक पोलीस आयुक्त सोनावणेंची माहिती; मंडळांच्या पदाधिकार्यांना बैठकीत सुचना पनवेल : वार्ताहर गणेशोत्सव सण साजरा करताना शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे व नियमांचे पालन न करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांनी दिली. ते खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी …
Read More »ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. तोपर्यंत म्हणजेच पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 20 जुलै रोजी न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली होती. त्याचवेळी न्यायालयाने हे आरक्षण ज्या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांची आधीच घोषणा …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चौथी मार्गिका विचाराधीन
मुंबई : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 22) विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केल्या गेलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक खूप वाढली …
Read More »पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे प्रकल्पातील अडथळा दूर
वनजमीन हस्तांतरित करण्यास केंद्राची मंजुरी मुंबई : प्रतिनिधी पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्पाआड येणारे वृक्ष हटवून लवकरच रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या …
Read More »कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात मी स्वतः लक्ष घालत आहे आणि त्या अनुषंगाने या बँकेच्या घोटाळ्यातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २२) विधिमंडळात दिली. रायगड जिल्हयातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील तसेच …
Read More »पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत हे पत्राचाळ घोटाळाप्रकरणी सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक …
Read More »खारघरमध्ये फुटबॉल स्पर्धा : परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर ः रामप्रहर वृत्त भाजप कार्यकर्ते व समाजसेवेत योगदान देणारे समीर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर सेक्टर 16 येथील केपीसी शाळेचे टर्फ मैदानात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 21) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप खारघर मंडल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper