Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट

एके 47 रायफल्स, जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ श्रीवर्धन ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात गुरुवारी (दि. 18) संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल आणि जिवंत काडतुसे असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या …

Read More »

आज दहीहंडीचा थरथराट!

लाखोंच्या बक्षिसांचे लोणी चाखण्यासाठी गोविंदा पथके सज्ज अलिबाग ः प्रतिनिधी लहान मुलांपासून सर्वांच्याच आवडीचा सण म्हणजे गोपाळकाला. हा सण शुक्रवारी (दि. 19) साजरा होत आहे. यानिमित्त उभारण्यात येणार्‍या दहहंडीसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. भाजपच्या वतीने उलवे नोडमध्ये एकूण तीन लाख 55 हजार 55 रुपयांची पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी …

Read More »

पालीतील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली शहरामधील  गुरवआळी व होळीचा माळ येथील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. या चौकातील नामफलकाचे अनावरण नगराध्यक्षा गीता पालरेचा व सेवानिवृत्त सैनिक अतिष सरनाईक यांच्या हस्ते  करण्यात आले. पालीतील गुरवआळी व होळीचा माळ चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी …

Read More »

पत्नीला आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस बिहारमधून अटक

पेण पोलिसांची कामगिरी पेण : प्रतिनिधी पेणमधील वाशीनाका येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या आरोपी पती मोहन रामअवतार यादव (वय 38) याला पेण पोलिसांनी बिहारमधील झांझा, जिल्हा- जमुई येथून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रुपेश चंद्रकांत म्हात्रे (वय 30, रा. सरेभाग, वाशी ता. पेण) …

Read More »

यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आवश्यक -डॉ. कोकाटे मकबूल

मुरूडमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान मुरूड : प्रतिनिधी आपले आयुष्य सफल व यशस्वी बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व शिस्त बाळगणे खूप आवश्यक आहे. वेळेचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबूल कोकाटे यांनी मुरूड येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी …

Read More »

विजेचा धक्का लागून पाच म्हशींचा मृत्यू

वंजारवाडी येथील शेतकर्‍याला चार लाख रुपयांचा फटका कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वंजारवाडी येथील एका शेतकर्‍याच्या पाच म्हशींना जिवंत वीज वाहिनीचा धक्का लागून त्या जागीच मरण पावल्या. या पाच म्हशींची किंमत सुमारे चार लाख रुपये असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील चंदू …

Read More »

जिल्ह्यात सरासरीच्या 80.76 टक्के पाऊस

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊ लागलाय. पावसाची हळूहळू परतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. गुरुवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासात सरासरी 20.02 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत सरासरी दोन हजार 504.81 मिमी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. …

Read More »

रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान

रेवदंडा : प्रतिनिधी स्वच्छ सागर, सुरक्षीत सागर उपक्रम अंतर्गत साळाव येथील जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या सयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 17) रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेवदंडा पारनाका येथून समुद्र किनारी स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. मेरीटाईम बोर्डचे रेवदंडा बंदर पोर्ट इन्स्पेक्टर सतिश देशमुख, पोर्ट इस्पेक्टर कुबारू, …

Read More »

खोपोलीत आढळला डेंग्यू सदृश्य रुग्ण

खोपोली : प्रतिनिधी येथील बाजारपेठेत मोबाईल कव्हरची विक्री करणार्‍या अरविंद कुमार याला डेंग्यू सदृश्य रोगाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने खोपोली शहरात खळबळ उडाली आहे. अरविंद कुमार हा मूळचा कल्याणचा रहिवासी असून तो सध्या खोपोलीत राहत आह. बाजारपेठेतील सार्वजनिक मुतारीच्या भिंतीजवळ तो मोबाईल कव्हर्स व इतर वस्तूंची …

Read More »

बिअर शॉपीसमोर उघड्यावर बिअर पिणाऱ्या मद्यपींना आवरा 

पनवेल : प्रतिनिधी – बिअर शॉप समोरच बिअरचे सेवन करणाऱ्या मद्यपींमुळे परिसर अस्वच्छ होत असून नागरिकांना नाहक त्रास होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून नागरिकांच्या हिताकडे शासनाचे लक्ष वेधले.  पनवेल तालुक्यातील कळंबोली, कामोठे येथे परवानग्या देण्यात आलेल्या बियर …

Read More »