माणगाव ः प्रतिनिधी साई विभागातील साई कोंड, विहुले व काकल गावातील तसेच आमडोशी व सुरव गाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्ते मंगळवारी (दि. 6) शिंदे गटाचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. या वेळी शिवसेना नेते अॅड. राजीव …
Read More »पेणमधील बेकरीवर कारवाईचे आदेश
पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील एका बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेकर्यांची पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश औषधे प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिले आहेत.पेण येथील अरविंद गुरव हे एका हॉटेलमध्ये सकाळी नाष्टा करण्यासाठी गेले असता तेथील पावामध्ये त्यांना उंदराची विष्टा आढळली. …
Read More »पनवेल, उरणमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप
पनवेल : रामप्रहर वृत्त लाडक्या गणपतीबाप्पाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर सोमवारी (दि. 5) पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोप देण्यात आला. शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानीही लाडका बप्पा विराजमान झाला होता. पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शिवाजीनगर येथील तलावामध्ये त्याचे भावपुर्ण वातावरणात विर्सजन …
Read More »उरणमध्ये मच्छीमारांसमोर जेलीफिशचे संकट
उरण : वार्ताहर उरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी मोठ्या प्रमाणावर विषारी जेलीफिश येत आहेत. उरणच्या समुद्र किनार्यावरही जेलीफिश दिसू लागले आहेत. या समस्येमुळे मासेमारी धोक्यात आली असून मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे. दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात झाली आहे, मात्र खराब …
Read More »चौक तुपगावमध्ये गणपतीला निरोप देताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जतन
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पावर विसर्जनादरम्यान पुष्पवृष्टी केली. त्याचप्रमाणे गणेशभक्तांना प्रसाद वाटून ऐक्याची परंपरा जपली. तुपगाव येथील यासीन भालदार, शरीफ भालदार व अन्य मुस्लिम बांधवांनी रायगड पोलीस दल अंतर्गत खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आणि तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील हनुमान मंदिराजवळ शामियाना …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ पुन्हा अपघात; दोघे ठार, 10 जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून मंगळवारी (दि. 6) पहाटे माडप बोगद्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इको कारने धडक दिली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्स्प्रेस वेवर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये वृक्षारोपण
पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या उद्देशाने विहंगम योग सेवा सत्संग आणि राष्ट्रीय एकता मंचने देशभर एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत खारघर सेक्टर 35 येथे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत व हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास …
Read More »‘मुंबईत भाजपसोबत निवडणूक लढविणार’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून युतीचा महापौर होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्यानंतर मुख्यमंत्री शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »मिशन 150!
सहकुटुंब, सहपरिवार मुंबई दौर्यावर येऊन गेलेल्या अमित शाह यांच्या दौर्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारले असल्यास नवल नाही. कारण देवदर्शनाच्या मधल्या काळात त्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि आमदारांच्या गाठीभेटीही घेतल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लावून दीडशेच्या वर जागा जिंकून दाखवाव्यात, असे स्फूर्तीदायक आवाहन …
Read More »गणेशोत्सवात ढोल-ताशा, ध्वज पथकांची धूम
तरुण, लहानग्यांमध्ये संचारला उत्साह पाली : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या काळात सुधागड तालुक्यात ढोल-ताशा या पारंपरिक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. कोरोना काळात दोन वर्षे निर्बंध होते मात्र आता सर्व निर्बंध हटल्याने गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकाला अधिक पसंती आहे. गणेशोत्सवात आपल्या ताल व लयबद्ध वादनाने हे ढोलताशा पथक सगळ्यांच आकर्षित करीत आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper