Breaking News

महत्वाच्या बातम्या

दोन अपघातात दोन ठार, दोन जखमी

खोपोली, महाड : प्रतिनिधी खोपोली-पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ बुधवारी (दि. 31)झालेल्या अपघात कंटेनरचालकाचा मृत्यू झाला, तर  मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि. 1) पहाटे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले. खोपोली-पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ वळण रस्त्यावर कंटेनर अनियंत्रित होऊन …

Read More »

कळंबोलीत मंगळागौर कार्यक्रम उत्साहात

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली सेक्टर 10 इ रोडपाली येथील वेरोना सोसायटीत गणेशोत्सवाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. मागील दोन वर्षे कोरोना काळात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करता आला नाही. यावर्षी मात्र सोसायटीच्या महिलांनी विविध कार्यक्रम राबवण्याचे ठरवुन उत्सवात जोश निर्माण केला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन सोसायटीच्या महिलांनी मंगळागौर व विविध …

Read More »

खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण; राजू सोनी यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी तत्परतेने खचलेल्या रस्त्याचे काम स्वःखर्चाने पूर्ण करून दिल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. शहरातील कोळीवाडा येथील काही भागाचा रस्ता खचलेला होता. या संदर्भात तेथील रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेशी संपर्क साधून तक्रार सुद्धा केली होती. गणेशोत्सवाच्या काळात येथून ये-जा करताना नागरिकांना मोठ्या त्रासाला …

Read More »

पनवेलमध्ये नियोजनबध्दरित्या बाप्पांचे विसर्जन

पनेवल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 200हून अधिक दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या विसर्जन करण्यात आले. गणेशभक्तांच्या सोयी सुविधांसाठी पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग या 7 …

Read More »

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

अलिबाग : प्रतिनिधी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे बुधवारी घरोघरी आगमन झाले. यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रायगड जिल्हयात एक लाखांहून अधिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि चैतन्य सोहळयाला प्रारंभ झाला. दरम्यान दीड दिवसांच्या गणपतींचे गुरूवारी मोठ्या भक्तीभावाने वाजतगाजत विसर्जन करण्यात झाले. घरोघरी बुधवारी सकाळी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात …

Read More »

गुडवण पुलाची स्थानिक तरुणांनी केली दुरुस्ती

कर्जत : बातमीदार तालुक्यातील चिल्हार नदीवर असलेल्या गुडवण गावाजवळील पुलावरील डांबर वाहून गेल्याने खड्डेमय रस्त्याने अनेक वर्षे वाहतूक सुरू आहे. त्याबाबत स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने गुडवण गावातील तरुणांनी श्रमदान व स्वखर्चाने पुलाची दुरुस्ती केली आहे. कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त सिडकोतर्फे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीची योजना सादर

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील सहा कार्यालये व त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे समाजातील विविध घटकांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होईल. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय …

Read More »

पनवेल येथे एचआयव्ही संक्रमित महिलांसाठी संमेलन उत्साहात

पनवेल : वार्ताहर पनवेल आधार विहान प्रकल्प यांच्या वतीने व युनायटेड वे इंडियाच्या सहयोगाने पंचायत समिती हॉल येथे एचआयव्ही संक्रमित महिलांसाठी संमेलन झाले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था संजय माने, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, धीरूभाई अंबानी एआरटी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रिय सेवा योजनेंतर्गत व पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 30) आधार कार्ड व मतदान ओळखापत्राशी जोडण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत पनवेल महापालिकेचे अधिकारी डी. डी. निकम तसेच पनवेलचे नायब तहसीलदार …

Read More »

पनवेलमध्ये सायबर क्राईम माहिती कार्डचे प्रकाशन

भाजप शहर सरचिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल शहर सरचिटणीस, जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 29) केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सायबर क्राईम माहिती कार्डचे प्रकाशन माजी सभागृह नेते …

Read More »