Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जतमधील रानभाजी महोत्सवाला ग्राहकांची मोठी गर्दी

कर्जत : बातमीदार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दहिवली येथील सभागृहामध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागातील  शेतकर्‍यांनी महोत्सवात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आणि जंगली भाज्या मांडल्या होत्या. या महोत्सवाला स्थानिक ग्राहक आणि शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक हीच मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल -सुनील पाटील; खोपोलीत शोकसभा

खोपोली : प्रतिनिधी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे विनायकराव मेटे आग्रही होते. मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण व प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक पूर्णत्वास नेणे, हीच स्वर्गीय विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील …

Read More »

माणगाव नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नांना यश माणगाव : प्रतिनिधी राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत माणगाव तालुक्यात अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजूरी मिळाली असून, लवकरच ही कामे मार्गी लावू, अशी आमदार भरत गोगावले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.  आमदार भरत गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने …

Read More »

सरसगडाच्या पायर्‍यांवरून घसरून तरुण पडला

स्थानिक व रेस्क्यू टीमच्या मदतीने आणले खाली पाली, खोपोली : प्रतिनिधी सुधागड पालीतील सरसगड किल्ल्याच्या पायर्‍यांवरून घसरून रविवारी (दि. 21) सायंकाळच्या सुमारास एक तरुण खाली पडला. त्याचा डावा हात फॅक्चर झाला असून खांदा निखळला आहे व कमरेला मुका मार लागला आहे. स्थानिक तरुण व खोपोली येथील यशवंती हायकर्स टीमने या …

Read More »

बाळगंगा नदी प्रदूषणप्रकरणी उत्तम स्टीलला बंदची नोटीस

कामगारांच्या नोकरीवर गदा; तीव्र संताप खोपोली : प्रतिनिधी जलप्रदूषण केल्याप्रकरणी खालापूर तालुक्यातील उत्तम स्टील कारखाना व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण  मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली नोटीस दिली आहे. त्यामुळे या कारखान्यातील कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे नोकरी धोक्यात आल्याने कामगार वर्गातून व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. …

Read More »

मोदी सरकारच्या माध्यमातून देशातील गोरगरीबांचे कल्याण – केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल

महाड, प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित आहेत. देशातील नागरिकांना अन्न-पाणी पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असतानाही आज पंतप्रधान मोदी केंद्राच्या माध्यमातून मोठा वाटा उचलत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्तीमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सोमवारी (दि. 22) केले. रायगड लोकसभा …

Read More »

खांदा कॉलनीत कॅन्सर चिकीत्सा शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीत नव्याने सुरू झालेल्या ओन्कोकेएर सेंटर यांच्या माध्यमातून पनवेल तालुका भंडारी समाजाचे एक दिवसीय कॅन्सर चिकीत्सा शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 21) करण्यात आले. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत भंडारी समाजाचे मान्यवर नेते उपस्थित होते. …

Read More »

कामोठ्यात अवघ्या दहा रुपयांत इडली

परेश ठाकूर यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 21 येथे नव्याने नादभ्रम्ह इडली हे हॉटेल सुरू झाले आहे. हे हॉटेल प्रतिक शिंदे व प्रम शिंदे यांनी सुरु केलं असून या नादभ्रम्ह इडली या हॉटेलचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 21) …

Read More »

पनवेलमध्ये मुंबई अनुव्रत समितीचा संघटन दौरा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई अनुव्रत समिती तर्फे रायगड विभागाच्या प्रचार प्रवासाचा संघटन दौर्‍याचा कार्यक्रम मुंबई अध्यक्ष कांचन सोनी, मंत्री वनिताजी बाफना यांच्या अध्यक्षतेखाली पनवेलमधील तेरापंथ भवन रविवारी (दि. 21) झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत …

Read More »

खारघरमधील गणेश मंदिराचा कळसरोहण सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त खारघर, हाईड पार्क सोसायटी मधील गणेश मंदिराच्या कळस रोहणाचा भव्य कार्यक्रम सोहळा पार्कच्या रहिवाश्यांनी विधीवत जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. सकाळी पंचांग पूजन, होम हवन आणि कळस पूजन करण्यात आले आणि …

Read More »