Breaking News

महत्वाच्या बातम्या

अखेर विमानतळाला मिळणार दि. बा. पाटलांचे नाव

कृती समिती आणि भूमीपुत्रांच्या लढाईला मोठे यश पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हेका कायम ठेवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समिती व भूमीपुत्रांच्या लढाईमुळे अखेर माघार घेत आज मंत्री मंडळाच्या बैठकीत दि. बा. पाटील यांच्या नावाच्या …

Read More »

भाजप सांस्कृतिक सेलच्या नियुक्त्या जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहराच्या भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या बुधवारी (दि. 29) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्या. रुद्रतेज शेटे, कौस्तुभ पाटील, कौस्तुभ सोमण, श्रेयस वाणी, सिद्धार्थ जोशी, शुभम साळवी, भूषण पाटील, साहिल शिंदे, साक्षी म्हात्रे, छायल भारंबे, प्रांजल आढाव, विजय नालंकर, ऋषिकेश जैतपाल, …

Read More »

…अन्यथा देवळे धरणामुळे घात झाला असता!

पोलादपूर तालुक्यातील देवळे धरण पूर्ण होऊनही अद्याप पाणी साठवून ठेवण्यात यश आलेले नाही. राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण लघुपाटबंधारे स्थानिक स्तर मंडळ ठाणे यांनी लघुपाटबंधारे स्थानिक स्तर उपविभाग माणगाव जि.रायगडच्या माध्यमातून सन 2008-2009 दरम्यान तयार केलेल्या टिपणी अहवालानुसार पोलादपूर तालुक्यातील विविध धरणांबाबत देवळे लघुपाटबंधारे योजना, लोहारे लघुपाटबंधारे योजना, तुर्भे खोंडा लघुपाटबंधारे …

Read More »

शेवटचा दे धक्का

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा कळसाध्याय आता सुरू झाला आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झाले असून जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झालेले बुधवारी बघायला मिळाले. खरे सांगायचे तर महाविकास आघाडी सरकारचा कारभार केव्हाच आटोपला आहे. परंतु ‘पोपट मेला आहे’ हे कुणीतरी अधिकृतरित्या सांगावे लागते.  अडीच वर्षांपूर्वी मागल्या दाराने येऊन महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले हे तीन …

Read More »

आवास येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव

रेवदंडा : प्रतिनिधी क्षात्रैक्य समाजाच्या वतीने आवास येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चौल पाचकळशी समाज अध्यक्ष सुरेश घरत (कोटकर) यांनी केले. आवास येथे 6 ते 9 जानेवारी 2023 मध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (दि. 27)  सायंकाळी …

Read More »

कर्जत स्थानकात आणखी एक रेल्वेमार्ग, जुना पादचारी पूल होणार निकामी

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात नवीन लोहमार्ग टाकण्यात येत आहे. त्यासाठी भिसेगाव-गुंडगे भागात जाणारा रेल्वेचा पादचारी पूल निकामी करण्यात येणार आहे. दरम्यान, नवीन रेल्वेमार्गामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून नवीन पादचारी पूल उभारला जात असून त्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुण्याकडे जाणार्‍या सर्व गाड्या अतिरिक्त इंजिन …

Read More »

रोह्यातील रस्त्याची दूरवस्था; किमान खड्डे भरण्याची नागरिकांची मागणी

रोहे : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील सागर डेअरी ते एक्सल कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत आहेत. त्याचा प्रवासी व वाहनचालकांना त्रास होत असून रोहा नगर परिषदेने किमान खड्डे तरी भरावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रोहा नगर परिषद हद्दीतील सागर …

Read More »

वरंध घाटामध्ये दरड कोसळून एक जखमी

महाड : प्रतिनिधी महाड-भोर मार्गावरील वरंध घाटामध्ये वाघजाई मंदिराजवळ बुधवारी (दि. 29) सकाळी दरड कोसळली. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. ही दरड लहान स्वरूपात असल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. वरंध घाट पावसाळ्यामध्ये सातत्याने धोकादायक ठरत आहे. या घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा घाट बंदही …

Read More »

घरातून निघून गेलेल्या मुलीचा चार तासात शोध

माणगाव पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन माणगाव : प्रतिनिधी घरातून निघून गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा चार तासांच्या आत शोध घेऊन माणगाव पोलिसांनी तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. माणगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे राहणार्‍या  मंगला संदिप वाघमारे (वय 28) यांनी त्यांची मुलगी तेजश्री संदिप वाघमारे (वय 13) ही सोमवारी (दि. 27) दुपारी …

Read More »

कर्जतचे चित्रकार सुनील परदेशींना ’सिग्नेचर मेंबर’ चा बहुमान

कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथील चित्रकार सुनील परदेशी यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला-संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणारे ते भारतातील दुसरे चित्रकार ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना फ्लोरा बी गिफुनी यांनी 1972मध्ये केली. ही संस्था अमेरिकेतील सर्वात जुनी …

Read More »