Breaking News

महत्वाच्या बातम्या

कळंबुसरेत वनविभागाचा घरावर बुलडोझर

उरण : प्रतिनिधी भर पावसात उरण वनविभागाच्या अधिकार्‍यांनी कळंबुसरे गावातील एका रहिवाशाच्या अनधिकृत घरावर कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता बुलडोझर फिरवला आहे.उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील एका रहिवाशाने गावात कुटुंबाच्या गरजेपोटी वाढीव घराचे बांधकाम केले होते. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या घरावर भर पावसात बुलडोझर फिरवला. ऐन पावसात संपूर्ण घर उद्ध्वस्त केल्याने ग्रामस्थांनी …

Read More »

स्थायी समितीच्या सभेत अध्यक्षांनी मानले सर्वांचे आभार

पनवेल ः प्रतिनिधी माझ्या कारकिर्दीत महापालिका मुख्यालय, क्रिकेट केडमी, पायाभूत सोयीसुविधांची कामे, समाजमंदिरे अशी कामे होऊ शकली. त्याबद्दल सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो असे स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष नरेश ठाकूर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात प्रतिपादन केले-महापालिकेची स्थायी समितीची पहिल्या पंचवार्षिक मधली शेवटची सभा शुक्रवारी (दि. …

Read More »

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सहाय्यता निधीचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त महापौर सहाय्यता निधीतून महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे हस्ते दिव्या हेमंत राणे या दहा वर्षीय मुलीला मदतीचा धनादेश देण्यात आला. पनवेल महापालिकेच्या कार्यालयात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 8) महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता …

Read More »

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन उभारावे

भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल मनपा हद्दीमध्ये  भूखंड राखीव ठेऊन तेथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी …

Read More »

देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला

पनवेलकरांना दिलासा; दिवसाला 12 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने पनवेलला पाणीपुरवठा करणार्‍या देहरंग धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. महापालिकेने धरणातून दिवसाला 10 ते 12 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेले दीड महिना सुरू असलेल्या पाणीटंचाईतून पनवेलकरांची सुटका …

Read More »

चुकीच्या धोरणांमुळे सहकारी बँका अडचणीत येतात -सतीश मराठे

जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाच्या अलिबाग कार्यालयाचे उद्घाटन अलिबाग : प्रतिनिधी ढिसाळ व्यवस्थापन, चुकीची धोरणे, व्याजदर ठरवण्यातील समस्या, मार्केटींगकडे दुर्लक्ष यामुळे  सहकारी बँका व पतसंस्था  अडचणीत येतात, असे मत रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अलिबाग येथे स्वमालकीचे  नवीन कार्यालय घेण्यात आले …

Read More »

उसर्ली खुर्द माजी सरपंचांपासून धोका

मच्छिंद्र पाटील यांची पोलीस संरक्षणाची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विश्वास लक्ष्मण भगत यांनी बनावट बांधकाम परवाना देऊन पदाचा गैरवापर केला. याबाबत मच्छिंद्र आत्माराम पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा मनात राग धरून विश्वास भगत यांच्यापासून मला …

Read More »

द्रुतगती मार्गावर खोल दरीत कार कोसळली; तीन जण गंभीर जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी बोरघाट उतरताना आडोशी गावाच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. 8) दुपारी इरटीका कार द्रुतगती मार्गाच्या लोखंडी पट्टीचे संरक्षक कठडे तोडून 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इरटीका कार (टीएस 08,जीएन-1219) द्रुतगती …

Read More »

म्हसळा तालुक्यात संततधार

आठवड्यात 611 मिमी पावसाची नोंद; बळीराजा गुंतला शेतात म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. चालू हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला असला तरी त्याने मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. म्हसळा तालुक्यात आजपर्यंत एकूण 1094 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात गेल्या आठवड्यात 611 मिमी पाऊस …

Read More »

भिवपुरी रोड रेल्वेस्थानक परिसरात पाणीच पाणी!

प्रवाशांची तारेवरची कसरत कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाला मागील वर्षी पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. त्या वेळी मध्य रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे मार्गाखालून नाला बांधण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ खोदकाम करून ठेवले आणि नाला बनविला नाही. त्यामुळे शुक्रवार (दि. 8) सकाळपासून भिवपुरी रोड …

Read More »