मुंबई ः प्रतिनिधी महावितरणच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त भांडूप परिमंडलातील विविध मंडळ कार्यालयातर्फे कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भांडूप परिमंडळ व ठाणे मंडळ कार्यालयाचे कार्यक्रम मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोंकण प्रादेशिक विभागाचे, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर, भांडूप परिमंडळाच्या अधीक्षक …
Read More »शिरवणेत दूषित पाणीपुरवठा
नागरिक संतप्त; माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी अधिकार्यांना विचारला जाब नवी मुंबई ः प्रतिनिधी शिरवणे गाव व सेक्टर 1 परिसरातील रहिवाशांना मागील दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता, तसेच येणारे पाणी दूषित व गढूळ असल्याने नागरिक संतप्त झाले. याबाबत भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपाच्या पाणी पुरवठा …
Read More »मुख्यमंत्र्यांनी राज्यातील समस्यांकडे लक्ष द्यावे
आमदार नितेश राणे यांनी साधला निशाणा नाशिक ः प्रतिनिधी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मंगळवारी (दि. …
Read More »महिला रायगड प्रीमियर लीगच्या सराव सामन्यांमध्ये खेळाडूंची चमक
कर्जत : बातमीदार महिला रायगड प्रीमियर लीग होऊ घातली आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्ह्यातील होतकरू महिला खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव आणि खेळाचे विविध पैलू शिकण्याची संधी मिळावी तसेच प्रथितयश खेळाडूंचा खेळ जवळून अनुभवता यावा यासाठी रायगड प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे दोन सराव सामने आयोजित करण्यात आले. बेलापूर येथील …
Read More »पनवेलमध्ये भाजपतर्फे मोदी सरकारच्या विविध योजनांची सर्वसामान्यांना माहिती
पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना राबवून नागरिकांना त्याचा लाभ देण्यात आला. त्या अनुषंगाने सरकारच्या या योजनांची माहिती जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व या कार्यक्रम …
Read More »तेजस्विनी फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
पनवेल : वार्ताहर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अलिबाग रायगड यांच्या पनवेल शाखेतर्फे हुतात्मा स्मारक उद्यान रोटरी क्लब पनवेल येथे नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. पनवेल शाखा प्रमुख विजय पाटील तसेच राखी पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामध्ये फुलझाडांचे व फळझाडांची रोपे …
Read More »लाचखोर सहाय्यक जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात
अलिबाग : प्रतिनिधी एमआयडीसीतील जागेच्या कामासंदर्भात 30 हजारांची लाच स्वीकारताना रायगडचे सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे जिल्हा निबंधक कार्यालयातील खाबूगिरी समोर आली आहे. तक्रारदार यांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय असून ते एमआयडीसीमधील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे …
Read More »शांतिवन येथे रंगला अनोखा माती उत्सव
पनवेल : वार्ताहर कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संचालित स्नेहलता निसर्गोपचार केंद्रात माती उत्सव साजरा करण्यात आला. वाशी, नवी मुंबई येथील स्वामी विवेकानंद केंद्राचे डॉ. जगदीश नायक व मुंबईचे डॉ. कौस्तुभ साळवी यांच्या संकल्पनेतून माती उत्सवाचे आयोजन शांतिवन पनवेल निसर्गोपचार शास्त्रानुसार उन्हाळ्यातील गर्मी व शरीरांतर्गत सूज कमी करण्यास योग्य माती लेप …
Read More »24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने 24 जून या ‘दिबांं’च्या स्मृतिदिनी सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात …
Read More »बारावीच्या परीक्षेचा बुधवारी निकाल; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. यंदा परीक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper