Breaking News

महत्वाच्या बातम्या

बिरवाडीतील अतिवृष्टीबाधिताचा नुकसानभरपाईसाठी उपोषणाचा इशारा

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यासह बिरवाडीमधील अनेक दुकानांचे नुकसान झाले होते. त्याचे रीतसर पंचनामे करण्यात आले होते आणि त्यानुसार शासनाकडून दुकानदारांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र बिरवाडी येथील आपले सरकार सेवा केंद्राचे मालक मयुर कांबळे यांना अद्याप शासनाचा मदत निधी मिळालेला नाही. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाकडून हालचाली …

Read More »

ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल; भाजपकडून 27 टक्के आरक्षण देण्याची ग्वाही कोल्हापूर ः प्रतिनिधी ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मात्र …

Read More »

भोंग्यांच्या मुद्यावरून पनवेलमध्ये कडक पोलीस बंदोबस्त

पनवेल : रामप्रहर वृत्त भोंग्यांच्या मुद्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः बुधवारी (दि. 4) राज्यभरात सुरू असलेल्या भोंग्यांबाबतच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्ये उमटू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. बुधवारी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात …

Read More »

मनसेतर्फे पालीतील मारुती मंदिरात पोलीस बंदोबस्तामध्ये आरती, हनुमान चालिसा

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका मनसेतर्फे बुधवारी (दि. 4) पालीतील मारुती मंदिरामध्ये आरती करण्यात आली तसेच छोट्या स्पीकरवर हनुमान चालिसादेखील लावण्यात आली होती. या वेळी मंदिराभोवती व पाली शहरात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तालुक्यातील मनसेच्या 10 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सीआरपीसी कलम …

Read More »

नदीपात्रात बांधकाम, खारफुटीची कत्तल

अतिक्रमण हटविण्यासाठी खारगाव बुद्रुक ग्रामस्थांचे म्हसळा तहसीलदारांना निवेदन   म्हसळा ः प्रतिनिधी शहराला लागूनच असलेल्या जानसई नदी पात्रात खारफुटी (मँग्रोज)ची कत्तल करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून कोळंबी प्रकल्प तयार करण्यासाठी आरसीसी पद्धतीचे पक्के बांधकाम करण्यात येत आहे. हे अतिक्रमण त्वरीत हटवावे, अशी मागणी खारगाव बुद्रुक ग्रामस्थांनी  …

Read More »

उमटे धरणाबाबत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना साकडे

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील उमटे धरणात साचलेला गाळ काढून या धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी बुधवारी (दि. 4) केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली.केंद्रीय मंत्री कपिल पाटील बुधवारी अलिबाग तालुक्यात आले होते. त्या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

सुकापूरमध्ये कायदेशीर सल्ला कार्यालय सुरू

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर येथे अ‍ॅड. निलम भोसले आणि प्रा. प्रफुल भोसले यांनी ‘बाबासाहेब्स लीगल असोसिएटस्ट’ हे कायदेशीर सल्ला देणारे कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 3) उद्घाटन झाले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

खारघरमध्ये नियोजनशुन्य पाणीपुरवठा

भाजपकडून सिडकोचा जाहीर निषेध खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी सिडकोकडे पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजप पदाधिकारी …

Read More »

मुरूड समुद्रकिनार्‍यावर तेल तवंग, पर्यटक त्रस्त

मुरूड : प्रतिनिधी लहान आकाराचे डांबरगोळे आणि तेलजन्य पदार्थांचे अवशेष पसरल्याने मुरूडचा संपूर्ण समुद्रकिनारा पुन्हा एकदा विद्रुप झाला आहे. त्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगरदांडा-दिघी जेटीजवळ येणार्‍या मोठ्या जहाजांमधून होणारी तेल गळती व बंदरात तेल लावून ठेवलेल्या बोटींमुळे समुद्राच्या पाण्यात तेल पसरते. हा तेलाचा तवंग लाटांसोबत …

Read More »

सुरूंग स्फोटाने ढेकू गाव हादरले; चार घरांचे नुकसान

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात डोंगर पोखरण्यासाठी बुधवारी (दि. 4) दुपारी करण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटामुळे महाकाय दगड, गोटे शेजारी असणार्‍या ढेकू (ता. खालापूर) गावात जाऊन पडले. त्यामध्ये चार घरांचे नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नव्या चौपदरी मिक्सिंग लिंकचे काम करण्यात येत …

Read More »