अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदचा सण मंगळवारी (दि. 3) मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. दोन धर्मियांचे सण एकत्र आल्याने धार्मिक सलोखा कायम रहावा यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण मंगळवारी होता. हा मुहूर्त साधून …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची 7 मे रोजी पुण्यतिथी
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कष्टकर्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांचा 34वा पुण्यतिथी कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य …
Read More »पनवेल महापालिका मुख्यालयाचे भूमिपूजन; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका मुख्यालयाचे मंगळवारी (दि. 3) अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 16, भूखंड क्रमांक 4 येथे पालिका मुख्यालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे. भूमिपूजन समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण …
Read More »पनवेल-मुंब्रा महामार्गालगतच्या जलवाहिन्या जीर्ण
महाराष्ट्र प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यय पनवेल ः रामप्रहर वृत्त ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पनवेल-मुंब्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची मागणी होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शहरामध्ये सध्या आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला …
Read More »सीकेटी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे रहिवासी शिबिर उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 23 ते 29 एप्रिल दरम्यान नेरे येथील शांतीवन येथे 7 दिवसीय विशेष रहिवासी शिबिर उत्साहात झाले. 23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता शिबिराच्या उद्घाटनला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे …
Read More »मिनेश गाडगीळ राज्य शासनाच्या कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलसह रायगड जिल्ह्याला अभिमान वाटेल असे शेतीमधील नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारे प्रगतिशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांना राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीकरिता कृषिभूषण 2019 पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, …
Read More »नगरसेवक अजय बहिरा, युवानेते प्रतीक बहिरा यांनी दिल्या ईदीच्या शुभेच्छा
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहराजवळील तक्का परिसरात स्थानिक नगरसेवक अजय बहिरा तसेच प्रतीक बहिरा युवामंचाचे प्रतीक बहिरा यांनी आज मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी मुस्लीम बांधवांसह तेथे आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी व बांधवांना शुभेच्छा देत …
Read More »भाजप नेते सय्यद अकबर यांनी दिल्या ईदीच्या शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका भागात मोठ्या उत्साहात व शांततेत रमजान ईद साजरी झाली. नवीन पनवेल दारूल अमन मस्जिद जवळ भाजप नेते सय्यद अकबर यांनी गुलाबपुष्प व रुमाल वाटप करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला. नवी मुंबई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, खांदेश्वर पोलीस …
Read More »महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त नावड्यात कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने उत्सव महाराष्ट्राचा-संस्कृती महाराष्ट्राची हा बहरदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 1) रंगला. या सोहळ्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, …
Read More »पेण अर्बन बँक ठेवीदारांना न्याय द्या; सर्वपक्षीय धरणे आंदोलन
भाजप आमदारांनी उपस्थित राहून दिला पाठिंबा पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडल्या गेलेल्या ठेवीदारांच्या न्याय हक्कांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 2) पेण नगर परिषदेसमोरील हुतात्मा कोतवाल चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास भाजपच्या चार आमदारांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper