पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस उद्या मंगळवारी (दि. 19) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यामध्ये पाणपोईचे उद्घाटन, प्रभाग 19 मधील नागरिकांसाठी मोफत फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते …
Read More »कळवेतील खारभूमी हडपणार्यांवर गुन्हे दाखल करा
भूमिपुत्रांचे नेते दशरथदादा पाटील यांची शासनाकडे मागणी ठाणे ः प्रतिनिधी कळवे येथील खारभूमीवर राजकीय आशीर्वादाने भूमाफियांनी कब्जा सुरू केला आहे. या भूमाफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संघर्ष कृती सेवासंस्थेचे संस्थापक दशरथ पाटील यांनी खारभूमी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता स्मिता घोडेस्वार यांना निवेदन देताना केली. या वेळी दशरथ पाटील यांच्या …
Read More »पनवेलमध्ये रॅम्पवर अवतरली छोट्यांची किलबिल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना क्राऊन बहाल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल स्मार्ट मम्मिज या सेवाभावी संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी रॅम्प वॉक अर्थात फॅशन शोचे आयोजन शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 17)सायंकाळी करण्यात आले होते. विशेष म्हणजे कर्णबधीर मुलांनीदेखील या शानदार फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक …
Read More »पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे लाभार्थ्यांना कार्ड वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आणि स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 18) आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रतिसाद लाभला. या वेळी पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे कार्ड वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. शासनाचा आरोग्य विभाग, महाराष्ट्रभूषण डॉ. नानसाहेब …
Read More »पनवेल मनपा स्थायी समिती सभेत 1,499 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका स्थायी समितीच्या सोमवारी (दि. 18) झालेल्या विशेष सभेत महापालिकेच्या 2022-2023च्या 1,499 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 18) महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय स्थायी समिती विशेष सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या विशेष सभेत महानगरपालिकेचे 2022-2023 चे 1499 …
Read More »पिकांवरील अमरवेल शेतकर्यांसाठी डोकेदुखी
महाड तालुक्यातील अनेक भागात भातपिक घेतल्यानंतर त्याच शेतजमिनीत कडधान्यांची पूरकशेती केली जाते. येथील भातपिकांचे उत्पादन मोठे नसले तरी कडधान्याला मात्र बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने येथील शेतकरी कडधान्य पिक घेतात. मागणी आणि दर उत्तम असला तरी शेतकरी कडधान्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात अमरवेल पसरत असून अमरवेलचा हा विळखा …
Read More »कसळखंडमधील रस्ते होणार चकाचक!
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कसळखंड ग्रामपंचायत हद्दीत भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत विविध रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष …
Read More »विवेक पाटलांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला
पनवेल : रामप्रहर वृत्त कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे घोटाळेबाज विवेक पाटलांचा मुक्काम आणखी काही काळ तुरूंगातच असणार हे स्पष्ट झाले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे कर्नाळा बँक घोटाळ्यात भरडले …
Read More »रोजगारक्षमतेवर भर
पदवीधर तरुणांच्या अध्ययनाच्या कक्षा विस्तारून त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) आपला द्विपदवी कार्यक्रम नुकताच जाहीर केला. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गतच्या या कार्यक्रमामुळे यापुढे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी, पदविका वा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर दोन वेगवेगळ्या शाखांचे किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांचे अभ्यासक्रमही पूर्ण …
Read More »लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्कर प्रमुख
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे नाव देशाच्या नव्या लष्करप्रमुखपदी निश्चित करण्यात आले आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे येत्या 30 एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकार्यांच्या श्रेणीत पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper