Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्येही भाजप स्थापना दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन पनवेलमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे संबोधित केले. त्या अनुषंगाने पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात या संवाद कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन …

Read More »

देश बदलतोय, प्रगती करतोय!

पंतप्रधान मोदींकडून भाजप स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा नवी दिल्ली : वृत्तसंस्था आधी भारतात निराशा होती. आज देशातील प्रत्येक जण म्हणतोय की देश बदलतो आहे, गतीने प्रगती करतो आहे. कसल्याही भीतीविना आपल्या हितांसाठी लोक काम करीत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 6) केले. ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापना …

Read More »

भाऊचा धक्का-काशीद जलवाहतूक डिसेंबरपासून

अलिबाग : केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत मुरूड तालुक्यातील काशीद येथील जेटीचे काम 50 टक्के पूर्ण झाले असून भाऊचा धक्का ते काशीद ही रो-रो सेवा डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकल्पावर 112 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे काशीद येथे येण्यासाठी मुंबईहून लागणारा वेळ वाचणार असल्याने पर्यटकांची …

Read More »

राज्यपालांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा

मुंबई ः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छेडानगर चेंबूर येथील श्री सुब्रह्मण्य समाजाच्या तिरुचेंबूर मुरुगन (कार्तिकेय) मंदिरातर्फे 12 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून यज्ञपूजेत भाग घेतला. या वेळी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, श्री सुब्रह्मण्य समाज संस्थेचे सचिव पी. एस. सुब्रमण्यम, मंदिराचे पदाधिकारी, तामिळनाडू येथून महाकुंभाभिषेकासाठी आलेले …

Read More »

तळेगावात पिकण्याआधीच भातशेती सुकली; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणाचा शेतीला फटका माणगाव : प्रतिनिधी एक महिन्यापासून कालव्याचे पाणी न मिळाल्याने  माणगाव तालुक्यातील तळेगाव परिसरामधील भातशेती पिकण्याआधीच सुकली आहे. कालव्याला त्वरित पाणी सोडावे, अन्यथा पाटबंधारे विभागाच्या माणगाव येथील कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा तेथील शेतकरी ग्रामस्थांनी दिला आहे. डोलवहाळ बंधार्‍याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यात  उन्हाळी भातशेती केली जाते. यंदा …

Read More »

रिक्षाचालकांचे उपोषण स्थगित

कर्जत शहरातील सर्व रिक्षा स्टँड अखेर खुले   कर्जत : बातमीदार पनवेल येथील परिवहन अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कर्जतमधील तीन रिक्षाचालकांनी आपले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि. 5) रात्री उशीरा स्थगित केले. कर्जत शहरातील रिक्षा स्टँडवर सदस्य नसलेल्या रिक्षाचालकांना व्यवसाय करण्यास स्थानिकांचा विरोध होता. त्यामुळे शहरातील सर्व रिक्षा स्टँड खुले करावेत …

Read More »

मुंगूर पालनामुळे महड परिसरात दुर्गंधी

खालापूर नगरपंचायतीचे मत्स्य विभागाला पत्र खोपोली : प्रतिनिधी पाताळगंगा नदीपात्र दूषित आणि दुर्गंधीस कारणीभूत असलेल्या मुंगूर तलावावर कारवाई करण्यासाठी खालापूर नगरपंचायतदेखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून, नगरपंचायतीने मुंगूर पालन तलावावर कारवाई करण्यासाठी जिल्हा मत्स्य विकास अधिकार्‍यांना पत्र दिले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंगूर प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व …

Read More »

पोषण पंधरवडा अभियानात रायगड जिल्हा अव्वल

अलिबाग : प्रतिनिधी देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकार तर्फे 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व लोकसहभाग या …

Read More »

आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार -आमदार प्रशांत ठाकूर

मुरूड : प्रतिनिधी आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) मुरूड येथे केले. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर मुरूड येथे आले होते. त्या वेळी मीट दि प्रेस या कार्यक्रमात ते पत्रकारांच्या …

Read More »

पालीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; नागरिक त्रस्त

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक देवस्थानापैकी एक धार्मिक स्थळ आहे. तसेच पाली हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने पालीत नेहमीच नागरिक व भाविकांची वर्दळ असते. मात्र अरुंद रस्ते व भाविकांची वाहने यामुळे पालीत वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे …

Read More »