Breaking News

महत्वाच्या बातम्या

खांदेश्वर कोकण महोत्सवाची खांदा कॉलनीत रंगत; लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजकांना शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळाच्या वतीने खांदा कॉलनीत खांदेश्वर कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सेक्टर 8 येथील पोलीस ठाण्यासमोर मैदानावर आयोजित या महोत्सवाला शनिवारी (दि. 19) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. …

Read More »

महाडमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा

महाड  : प्रतिनिधी येथील क्रिकेट कट्टा ग्रुपच्या वतीने खास महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्टार क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले, तर झेडपी संघ उपविजेता ठरला. महिलांना सांघिक खेळांमधून संधी मिळावी यासाठी क्रिकेट कट्टा ग्रुपची स्थापना करून या ग्रुपच्या वतीने रविवारी (दि. 20) महाडमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात …

Read More »

राष्ट्रीय एकात्मतेचा विचार वाढल्याशिवाय प्रांतवाद मिटणार नाही : भय्याजी जोशी

अलिबाग ः प्रतिनिधी देशात राष्ट्रीय एकतेचा विचार वाढल्याशिवाय प्रांतवाद मिटणार नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्रमार्फत दिल्या जाणार्‍या श्री गुरुजी पुरस्काराचे वितरण रविवारी (दि. 20) अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. जीवन …

Read More »

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

खासदार संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित राहणार पनवेल ः वार्ताहर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक पेण येथे रविवारी (दि. 20) झाली. मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात छत्रपती खासदार संभाजीराजे 26 फेबु्रवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहणार …

Read More »

पनवेलमध्ये अ‍ॅडव्हान्स ट्रॉमा केअर सेंटर, प्रसूती व बालसंगोपन केंद्र उभारावे; आमदार प्रशांत ठाकूर यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रविवारी (दि. 20) पनवेल येथील खांदा कॉलनीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरला भेट देऊन आढावा घेेतला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

ज्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणात सण रोखले, त्यांना जनता उत्तर देईल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

लखनऊ ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 20) उत्तर प्रदेशातील हरदोई येथे जाहीर सभेला संबोधित केले. ज्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणात सण रोखले, त्यांना येथील जनता 10 मार्चला उत्तर देईल, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. अनेक दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा …

Read More »

‘तिसर्‍या आघाडीने एनडीएला काहीही फरक पडणार नाही’

मुंबई ः तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी (दि. 20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची …

Read More »

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे -अरुणशेठ भगत

गव्हाण विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा पनवेल : रामप्रहर वृत्त इयत्ता बारावी बोर्डाची परीक्ष समीप आली असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे असे प्रतिपादन, रयत शिक्षण संस्थे चे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य  अरुणशेठ भगत यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी …

Read More »

11 लाख नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

नवी मुंबई मनपाची 100 टक्के लसीकरणाकडे वाटचाल नवी मुंबई : बातमीदार कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत असून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र पहायला मिळते आहे. तथापि कोविड विषाणू अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून मास्कचा नियमित वापर व प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून जनजागृती केली …

Read More »

महाड चोचिंदे येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी

महाड : प्रतिनिधी सोने हॉलमार्कचे झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी वाल्या कोळ्याच्या भूमिकेतून बाहेर येऊन वाल्मिकी व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी केले. संत नरहरी सोनार पुण्यतिथी निमित्त विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजा तर्फे चोचिंदे (ता. महाड) गावामधील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मंदिरामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शैलेश पालकर बोलत …

Read More »