अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. सन 2018मध्ये या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्या वेळी राजेश सुर्वे यांच्या खांद्यावर संघटनेची धुरा सोपवण्यात आली होती. तीन …
Read More »मुरूड तहसील कार्यालयासमोर बाणकोटकर यांचे उपोषण सुरू
मुरूड : प्रतिनिधी एफआरआयमध्ये असलेल्या सर्व आरोपींची नावे न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात समाविष्ट करावीत, या मागणीसाठी राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास बाणकोटकर यांनी सोमवार (दि. 15)पासून मुरूड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हरिदास बाणकोटकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी राजपुरी कोळीवाड्यातील काही ग्रामस्थांनी हल्ला करून अंगणातील वस्तू समुद्रात फेकून दिल्या होत्या, …
Read More »नागोठण्यातील ‘रिलायन्स’विरोधातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले; पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड
पाली : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरोधात स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी कडसुरे येथे सोमवारी (दि. 15)जनआंदोलन छेडण्यात आले. सायंकाळपर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळले. या वेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली. स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्तांनी सोमवारी …
Read More »माणगाव, पोलादपूर नगरपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर
माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदाची आरक्षण सोडत सोमवारी (दि. 15) सकाळी माणगाव तहसील कार्यालय काढण्यात आली. 17 सदस्यांच्या माणगाव नगरपंचायतीमधील नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने ते नाराज झाले आहेत. माणगाव नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली होती. …
Read More »तुळशी विवाहासाठीची साहित्य खरेदी सुरू
उरण : वार्ताहर कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक सण साजरे झाले नाहीत. अनेक विवाहसुद्धा पुढे ढकलण्यात आले, मात्र आता स्थिती स्थिर असल्याने या वर्षी लग्न सोहळे जोरदार सुरू होतील. उरण बाजारपेठेत तुळशी विवाहासाठी लागणार्या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह सुरुवात झाल्यावर लग्न सोहळे सुरू होतात. तुळशी विवाहासाठी प्रामुख्याने …
Read More »गोरगरीब मुलांसोेबत ‘दिशा’चा बालदिन
पनवेल : रामप्रहर वृत्त बालदिनानिमित्त दिशा महिला व्यासपीठाने ओपन एज्युकेशनमधील मुलांसाठी बालमहोत्सव आसुडगाव येथे सोमवारी (दि. 15) आयोजित केला होता. यानिमित्त डोंबार्याचा खेळ करून पोटाची खळगी भरणार्या मुलांसाठी डॉ. कोलते व अनिता कोलते यांनी ब्रिजखाली सुरू केलेल्या शाळेत शिकणार्या मुलांसाठी हा दिवस आनंदात, उत्साहात जावा यासाठी आयोजन केले होते. चपलेऐवजी …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे हृदयतपासणी शिबिर
खारघर : प्रतिनिधी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे टुडी इको शिबिर झाले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व श्री सत्यसाई संजीवनी सेंटर चाईल्ड हार्टकेअर अॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रीक स्किल्स, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) हे शिबिर झाले. 14 वर्षे वयोगटातील मुलांची या वेळी हृदयतपासणी करण्यात आली. जन्मजात मुलांमध्ये हृदयविकाराचे …
Read More »नवी मुंबईत बालदिनी स्वच्छ चित्रकला स्पर्धा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बालदिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ला सामोरे जात असताना स्वच्छ नवी मुंबई शहराविषयी मुलांच्या मनात असलेल्या संकल्पनांना मूर्तरूप देण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ चित्रकला स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम 2997 विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी …
Read More »राष्ट्र सेवा दलाच्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्र सेवा दल संघटनेच्या रायगड जिल्हा शाखा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत 12 ते 18 वर्षे वयोगटांतील तरुण-तरुणींसाठी पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथे सात दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप रविवारी (दि. 14) बालदिनी करण्यात …
Read More »के. गो. लिमये वाचनालयात पंडित नेहरूंची जयंती आणि बालदिन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या संस्थेच्या वतीने बालदिनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सभासद दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक वत्सराज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी पं. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper