पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांना मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी समस्या दूर करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांनी …
Read More »स्व. जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात 27 जानेवारी ते 3 फेबु्रवारीदरम्यान स्व. श्री. जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेला संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »पनवेल परिसरात अपघात वाढले
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील खारघर आणि आजिवली या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत खोदकामामध्ये केबल टाकण्याचे काम करणार्या एका मजुराचा क्रेनच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. खारघर पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या क्रेन …
Read More »भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान
पनवेल : वार्ताहर भाजपचे पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चिखले येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत 600 विद्यार्थ्यांना अन्नदान केले. युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात येतो. यंदाही त्यांचे वाढदिवसानिमित्त युवा चषकाचे आयोजन, व्होकल फॉर लोकल माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांचा सन्मान हे …
Read More »बोरखार रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर विंधणे हरिश्चंद्र पिंपळे बोरखार या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तरतुदीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, उरण आणि पनवेल तालुक्यात विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार उरण विधानसभा मतदार …
Read More »गव्हाण विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात
विद्यार्थ्यांनी अत्युच्च स्थानाचे ध्येय ठेवावे -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि.29) उत्साहात झाला. या वेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे …
Read More »अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी जिंकला नमो चषक गीत गायन स्पर्धेचा किताब
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक गीत गायन स्पर्धेचा किताब अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी पटकाविला. देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार प्रदान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाज दर्पण पुरस्कार; तर कामगार नेते महेंद्र घरत यांना भूमिपुत्ररत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोकण दर्पण वृत्तपत्राचा 13वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा रविवारी (दि.28) नेरूळ …
Read More »मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डायलेसिस सेंटरचे उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधी कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम असलेल्या कमळ सेवा संस्था संचालित श्री. सतिश वासुदेव धारप डायलेसिस सेंटरचे शनिवारी (दि. 27) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अलिबागमधील श्रीबाग नं. 2 येथे हे डायलेसिस सेंटर सुरू झाले आहे. उद्घाटन समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे …
Read More »उलवेत चित्रकला स्पर्धा व आरोग्य शिबिर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती; आयोजकांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुजग सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उलवे सेक्टर 18 येथे शुक्रवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper