तळोजा मजकूर (ता. पनवेल) : श्री सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दर्शन घेतले.
Read More »प्रचंड मताधिक्क्याने विजयी होणार
पनवेल : वार्ताहर नगरपालिकेच्या निवडणुकीसह आमदारकी व खासदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मला पाडण्यासाठी व प्रामुख्याने अजित पवारांनी अटोकाट प्रयत्न केले, परंतु ते एकदाही यशस्वी झाले नाहीत. ही माझी आठवी निवडणूक असून या निवडणुकीतसुद्धा मागील मताधिक्क्यापेक्षा जास्त मते घेऊन मी निवडून येईल, असा ठाम विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि.13) खारघर …
Read More »अवैध मद्याची वाहतूक करणार्या दोघांना पोलिसांकडून अटक
पनवेल : बातमीदार पनवेल-मुंब्रा रस्त्यावर कळंबोली येथे पांढर्या रंगाच्या मारुती इर्टिगा गाडीमध्ये अवैध मद्याची वाहतूक करणार्या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 13 हजारांचे मद्य व वाहन जप्त करण्यात आले आहे. तुषार शालिक कडू (32, खारघर), शक्तीकुमार हरिनाथ मिश्रा (37, रोडपाली) अशी या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस …
Read More »महिलांनी स्वयंसिद्ध होणे गरजेचे – डॉ. स्वप्ना पाटकर
खारघर ः रामप्रहर वृत्त आजच्या गतिमान जगात वावरायचे असेल तर महिलांनी स्वयंसिद्ध होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वप्ना पाटकर यांनी नुकतेच खारघर येथे केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे टाटा हॉस्पिटल वर्कर्स युनियन आणि टाटा हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी डॉ. …
Read More »घराच्या वादातून चाकूचे वार; तरुण गंभीर जखमी
पनवेल : बातमीदार विक्रोळी येथील घराच्या वादाच्या भांडणाचा राग मनात धरून 27 वर्षीय तरुणाला शिवीगाळी करून त्याच्या छातीवर तसेच पाठीवर चाकूने वार केल्याची घटना खारघर येथे घडली. खारघर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अयाझ अब्दुल सैय्यद हे खारघर येथे राहत असून ते ड्रायव्हरचे काम करतात. विक्रोळी ईस्ट मुंबई …
Read More »मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात ; सहा महिन्यांत वाहतूक सुरू होणार, चिनी बनावटीचे डबे दाखल
खारघर ः रामप्रहर वृत्त सहा वर्षांपूर्वी बेलापूर ते पेंदार या मेट्रो रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. सिडकोने दक्षिण नवी मुंबईत पाच मेट्रो मार्गांचा आराखडा तयार केला आहे. यात बेलापूर ते पेंदार या मार्गाचा पहिला प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 26 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 8 हजार 887 कोटी रुपये …
Read More »स्वतःची अस्वस्थता लपवण्यासाठी सुपारीबाजाचे आमदारांवर शिंतोडे
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने रस्त्याचे काम रखडून लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गाढी नदीच्या किनार्याजवळ भिंगारी गावासमोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि महामार्ग रूंदीकरणाचे, तसेच सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी कामाला लागणारे कच्चे साहित्य आणि कामगारांना तात्पुरता निवारा व बसण्यासाठी सोय म्हणून असलेले गाळे तूर्त पाडले …
Read More »श्रीरंग बारणे पुुन्हा निवडून येतील ; शिवसेना नेते बबन पाटील यांचा विश्वास
पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचे नाव पुढे येत आहे, परंतु ते नवखे उमेदवार असल्याने गेली पाच वर्षे मतदारसंघात जनतेसाठी सदैव झटणारे युतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे हेच पुन्हा निवडून येतील, असा ठाम विश्वास शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी व्यक्त केला. ते …
Read More »‘रोटरी’तर्फे महिलांचा सन्मान
पनवेल : प्रतिनिधी महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान स्त्रीशक्तीचा या अंतर्गत रोटरी महिला सन्मान पुरस्कार 2019 वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात समाजात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रांतील एकूण 24 महिलांचा गौरव …
Read More »करंजाडेत पाककला स्पर्धेस प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. करंजाडे नोड महिला मोर्चा अध्यक्षा अॅड. प्रमिला ढौल यांनी कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper