पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी, उलवे नोड तसेच उलवे आय क्लिनिक यांच्या सहयोगाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले असून, या वेळी माजी खासदार लोकनेते ठाकूर यांनी भेट दिली. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे …
Read More »पळस्पे विद्यालयात त्रिवेणी संगम कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत विद्यालयाचे चेअरमन रवींद्र चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी संगम माजी विद्यार्थी गुणगौरव, दहावी शुभचिंतन व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात झाला. अमरदीप बालविकास फाऊंडेशन पनवेलच्या मार्फत मार्च 2018च्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र …
Read More »खोपटाचे काँग्रेस कार्यकर्ते भाजपत
जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त पनवेलप्रमाणेच उरण तालुक्यातही भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून रविवारी (3 फेब्रुवारी) खोपटा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश करीत विकासाचे कमळ हाती घेतले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्षा सायली …
Read More »बाबल्या आणि मित्र मंडळाची संशयितावर नजर
नितीन देशमुख – पनवेल : पाकिस्तानने अखेर घुडगे टेकून अभिनंदनला भारताच्या हवाली केले. रात्री उशिरापर्यंत आमच्या सोसायटीत बाबल्या आणि त्याच्या मित्रांच्यात या विषयावर चर्चा रंगली होती. एक एक जण तावातावाने आपले म्हणणे मांडत होता, पण सगळ्यांचे एकमत होते की दहशतवादी पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न नक्की करणार. यासाठी सर्वांनी काळजी …
Read More »सत्ताधार्यांच्या विकासकामात खोडा घालण्याचा विरोधकांचा प्रयत्न
पनवेल : प्रतिनिधी महानगर पालिकेत सत्ताधारी पक्षाने विकास कामाचा धडाका सुरू केल्याने राजकारण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विकासकामात खोडा घालण्यास सुरुवात केली असल्याचे नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या वक्तव्यावरून दिसत असल्याचे भाजपचे प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांनी सांगितले. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत वडाळे तलावाच्या सुशोभीकरणासाठी 12 कोटीची निविदा काढण्याच्या …
Read More »पनवेल मनपाचा शिलकी अर्थसंकल्प स्थायीत सादर
पनवेल : प्रतिनधी पनवेल महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प शनिवारी (दि. 2) स्थायी समितीत सादर करण्यात आला. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देऊन त्यासाठी 336 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांचेकडे सुपूर्द केला. …
Read More »पनवेल मनपा हद्दीत 96 कोटींची विकासकामे
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध ठिकाणी भूमिपूजने पनवेल : प्रतिनिधी सबका साथ, सबका विकास म्हणजे शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहोचला पाहिजे त्यासाठी विकासाची दोन्ही चाके म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम केले, तर जनसामान्यांचा फायदाच होतो याचा प्रत्यय पनवेलच्या नागरिकांना पाहायला मिळत असल्याचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी …
Read More »उरणमध्ये मराठी भाषा दिन साजरा
उरण : वार्ताहर उरणमधील यू.ई.एस. स्कूल आणि महाविद्यालयात बुधवारी (दि 27) ‘मराठी राजभाषा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यू.ई.एस. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, प्राचार्या प्रधान मॅडम, तसेच सिनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, सिनिअर कॉलेजचे …
Read More »फसवणूक प्रकरणी तळोजात एकास अटक
पनवेल : बातमीदार तळोजा येथे गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून मालकांकडून गाड्या ताब्यात घेऊन त्यांचे भाडेदेखील न देणार्या आरोपी विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 23 मालकांच्या 23 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. मनोज काळूराम पाटील (42) असे या आरोपीचे …
Read More »पळस्पे विद्यालयात मराठी भाषा, राष्ट्रीय विज्ञान दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे महत्त्व तनिषा राय, रंजना जैसवार, अंकिता सरोज, रिद्धी पवार यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेची थोरवी गाणारे गीते नागेश मुंडे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper