कळंबोली : प्रतिनिधी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाचे सुमारे 40 जवान शहीद झाले. त्याला रविवारी (दि. 24) 10 दिवस पूर्ण झाल्यामुळे भारतीय रीतिरिवाज व परंपरेनुसार कळंबोली कॉलनी येथे सामुदायिक मुंडण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सेवालाल …
Read More »बेवारस वाहनांबाबत संपर्काचे आवाहन
पनवेल : बातमीदार पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची 22 वाहने बर्याच दिवसांपासून बेवारस स्थितीमध्ये पडून आहेत. या वाहनाच्या मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बजाज डिस्कव्हर, पल्सर, महिंद्रा सेन्च्युरो, करिझ्मा, हीरो होंडा स्प्लेंडर, लाल कायनेटिक, स्प्लेंडर प्लस, पल्सर काळी, पॅशन प्रो, हीरो …
Read More »चिरनेर परिसरात आंबा मोहर करपला
चिरनेर : प्रतिनिधी भातशेतीत दरवर्षी तोटा होत असल्याने चिरनेर विभागातील शेतकर्यांनी हापूस आंब्यांची बागायत शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यंदा आम्रवृक्ष मोहरून गेले होेते. त्यामुळे आंब्याचे चांगले उत्पादन होईल या आनंदात शेतकरी असतानाच बदलत्या हवामानामुळे या बागायतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन आंब्याचा मोहर करपून गेला आहे. परिणामी बळीराजा हवालदिल …
Read More »कोप्रोली आरोग्य केंद्र आजारी
डॉक्टरांची वानवा, सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय हेळसांड जेएनपीटी : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या सुविधांचा अभाव, डॉक्टर वर्गाची वानवा, तसेच परिचारिकांची व कर्मचारी वर्गाची रिक्त पदे अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयात उपचारांसाठी येणार्या रुग्णांची हेळसांड होत आहे. उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास …
Read More »‘शेकापकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न’
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत सत्ताधारी पक्षाने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी करण्यात येणार्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष किंवा सत्ताधारी नगरसेवक हजर राहणार नाहीत, हे माहीत असतानाही आमची नावे टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न शेकापने केल्याचे भाजपचे प्रभाग समिती अध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि नगरसेवक महादेव मधे यांनी …
Read More »कर्नाळा ग्रामपंचायतीमधील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शेकापला झटका बसला आहे. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी …
Read More »भाजपचे विस्तारक विश्वेश साठे कालवश
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील भाजपचे नेते आणि पनवेलचे विस्तारक विश्वेश साठे यांचे शनिवारी (दि. 23) दुपारी आकस्मिक निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. साठे यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. विश्वेश साठे महाड येथे त्यांच्या घरी आले होते. दुपारी त्यांना अचानक चक्कर आल्याने तत्काळ …
Read More »पनवेलमध्ये आढळला आणखी एक मृतदेह
पनवेल : वार्ताहर येथील शिवशंभो नाका ते रेल्वेस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत.या इसमाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, डोक्यावरील केस साधारण असून, अंगात काळ्या रंगाचा ठिपके असलेला फूल बाह्यांचा शर्ट व मळकट निळ्या रंगाची पँट आहे. या …
Read More »मोरा सागरी पोलीस ठाण्यात बैठक
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नियोजन उरण, जेएनपीटी : वार्ताहर, प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी (एलिफंटा) येथे सोमवारी (दि. 4 मार्च) शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जात असतात. मोरा ते घारापुरी बोटीने जावे लागते. भक्तांची खूप गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार व अपघात होऊ नये यासाठी बोट मालकांनी कोणती खबरदारी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात, …
Read More »धमकावणारा इसम गजाआड
पनवेल : वार्ताहर एका महिलेचे अश्लील फोटो काढून फोनवरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिला धमकावणार्या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.डेरवली येेथे एका महिलेचे चोरून अश्लील फोटो काढून त्यानंतर तिला धमकावून व मनात लज्जा उत्पन्न होईल असे फोनवरून बोलणार्या इसमाबाबत संबंधित महिलेने तालुका पोलीस ठाण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper