आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आयकर धारक व अपात्र लाभार्थ्यांना वाटप केलेल्या निधीची वसुली करू नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रधानमंत्री किसान …
Read More »अल्पवयीन मुलीचे नग्न विडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजारांची खंडणी मागणारा अटकेत
पनवेल : वार्ताहर स्नॅपचॅट अँपवरून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख व संपर्क करून तिला तिचे नग्न फोटो व व्हिडीओ पाठविण्यास प्रवृत्त करून नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची खंडणी मागणार्या आरोपीस पनवेल तालुका पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे. पनवेल तालुक्यातील हेदुटणे येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आसूडगाव शाळेत वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात येतो. त्या अंतर्गत पनवेलजवळील आसुडगाव येथील जि. प. शाळेत भाजपचे तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ …
Read More »निसर्गाच्या सानिध्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत योग दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत युवा व ज्येष्ठांनी निसर्गाच्या सानिध्यात माची प्रबळगड येथे योगासने केली. या वेळी त्यांच्या चेहर्यावर वेगळेच समाधान दिसून आले. या वेळी पनवेल येथील इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती यांच्या वतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत चलो प्रबळगड!
जागतिक योग दिनानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त बुधवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय …
Read More »मच्छीमार संस्थांना डिझेलमध्ये अनुदान द्यावे
आमदार महेश बालदी यांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्र्यांकडे मागणी उरण : रामप्रहर वृत्त मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणार्या खाजगी तेल कंपन्या व पेट्रोल पंपांना शासनाकडून देण्यात येणार्या अनुदानाप्रमाणे मच्छिमारांच्या सहकारी संस्थांनाही डिझेलमध्ये अनुदान देण्याची मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री परषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. आमदार महेश बालदी …
Read More »रन फॉर एज्युकेशन रॅलीला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन पनवेल : प्रतिनिधी शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. एफएनएल अर्थात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचा पाया मजबूत झाला, तर भारतातील शिक्षण व्यवस्था मजबूत होईल हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »खारघरमध्ये मंगळवारी जी-२० समिट ‘रन फॉर एज्युकेशन रॅली’
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी भारताच्या जी-२० समिट अध्यक्ष पदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ विभागात एफ एल एन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक २० जून रोजी …
Read More »रांजणपाडा शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन शैक्षणिक वर्ष 2023-2024 च्या शाळेच्या पहिल्याच दिवशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-रांजणपाडा शाळेतील मुलांना दप्तर तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप रांजणपाडा गाव भाजप अध्यक्ष दयानंद मोकल यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वाटपच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पुढारी जीवन गौरव पुरस्कार
पनवेल : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पुढारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दै. पुढारी पनवेल-नवी मुंबई सन्मान सोहळा 2023चे पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवार (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper