Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नवीन पनवेलमध्ये एकाची निघृणपणे हत्या

पनवेल : वार्ताहर अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीची कोणत्यातरी हत्याराने निघृण हत्याकरून सदर मृतदेह नाल्यात टाकून ते पसार झाल्याची घटना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नवीन पनवेल उड्डाणपुलाखालील रेल्वेपटरीजवळ असलेल्या वाहत्या नाल्यात अंबिकानगर सोसायटीजवळ एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांना आढळून आहे. त्यांनी तत्काळ खांदेश्वर पोलिसांना याबाबत माहिती कळवली. खांदेश्वर …

Read More »

पनवेलचे विद्रुपीकरण करणार्‍यांवर होणार कडक कारवाई!

अनधिकृत बॅनरबाजी करणार्‍यांना महापालिकेने बजावल्या नोटीस पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृतपणे बॅनर, होर्डिंग्ज व भिंतीपत्रके लावणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा पवित्रा महापालिकेने घेतला असून या संदर्भातून अनधिकृतपणे बॅनर लावणार्‍यांवर नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच फौजदारी कारवाईसाठी मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 व मुंबई उच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात …

Read More »

ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगमध्ये रॉकविले फायटर, मॉर्निंग पंटर्स विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर सुरू असलेल्या टीआयपीएल ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात रॉकविले फायटर संघाने विजयी सलामी दिली, तर दुपारच्या सामन्यात मॉर्निंग पंटर्स संघाने विजय मिळविला. सलामीचा सामना प्रतिक क्रिकेट अकॅडमी विरुद्ध रॉकविले फाइटर असा रंगला. प्रतिक अकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत 179 धावा केल्या …

Read More »

नेरूळ-उरण रेल्वेमार्गावरील स्थानकांना महसुली, ऐतिहासिक, पारंपरिक गावांची नावे द्या

आमदार महेश बालदी यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नेरूळ-उरण रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसुली तसेच ऐतिहासिक व पारंपरिक गावांनुसार ओळख कायम राहावी या अनुषंगाने रेल्वेस्थानकांना नावे देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मंगळवारी (दि. …

Read More »

टेंभोडे परिसरात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने खळबळ

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या झाडाझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या क्रिकेट मैदानाच्या शेजारील नाल्यालगत असलेल्या झाडीझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काही जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती खान्देश्वर पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा 3 जूनला पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 3 जून रोजी …

Read More »

वडाळे तलाव स्वच्छतेसह जलचरांच्या सुरक्षेसाठी आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने वडाळे तलावाचे सुशोभीकरण नुकतेच केले आहे. सुंदर परिसर, रम्य वातावरण, समोर अथांग असे तळे पाहून पनवेलकर नागरिक हा मोकळा श्वास घेत सुखावत असतो, परंतु काही नागरिक हे त्याच तळ्यामधील माश्यांना खायला घालायला म्हणून येतात आणि नको नको त्या गोष्टी त्या तळ्यात टाकत असतात. त्यामुळे …

Read More »

एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यास अटक

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आणि आगरी कोळी, कराडी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे याला सोलापूर येथून अटक केली आहे. दुसर्‍या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह व अपशब्द पोस्ट करून …

Read More »

युवा वॉरियर्स फुटबॉल, व्हॉलीबॉल चषक स्पर्धा रंगली

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी खारघर येथील गोखले शाळेच्या मैदानात रंगलेल्या युवा वॉरियर्स व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते, तर खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून न्हावे विद्यालयासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 20) रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे भेट देऊन नूतन इमारतीची पाहणी केली. या वेळी त्यांनी उर्वरित काम टीआयपीएल कंपनीकडून पूर्ण करून देण्याचे जाहीर केले तसेच विद्यालयासाठी सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष …

Read More »