Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आकुर्लीच्या उपसरपंचपदी भाजपचे नितीन धरणेकर

पनवेल : रामप्रहर वृत्त आकुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे नितीन सत्यवान धरणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नितीन धरणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक सोमवारी (दि. 12) झाली. या निडवणुकीत भाजपचे नितीन सत्यवान धरणेकर …

Read More »

पनवेल एपीएमसीचे कोल्ड स्टोरेज धूळखात

बाजार समितीचीही दुरवस्था पनवेल : प्रतिनिधी पनवेलच्या बाजार समितीच्या मालकीचे अडीच कोटी रुपयांचे कोल्ड स्टोरेज भाड्याने घेण्यासाठी कोणी तयार नसल्याने  तीन वर्षे धूळ खात पडले आहे. त्यामुळे वर्षाला मिळणारे 21 लाख भाडे ही बुडाले आहे. छोट्या व्यापार्‍यांना फळे व इतर भाजीपाला ठेवण्यासाठी त्याचा वापर करता आला असता तोही होत नाही. …

Read More »

पनवेलमध्ये रंगला ‘उत्सव नात्यांचा’

कलाकार, मान्यवरांची सोहळ्यास उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त झी मराठी महाराष्ट्र सखी आणि जी. एस. फाउंडेशनच्या वतीने उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकताच मोठ्या उत्साहात रंगला. या सोहळ्याला माजी उपमहापौर चारुशीला घरत आणि वर्षा प्रशांत ठाकूर यांनी भेट देत कलाकारांना शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी …

Read More »

उरणमध्ये विविध पक्षांच्या सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर उरण भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 10) जेएनपीए बंदर वसाहतीच्या बहुउद्देशीय सभागृहात कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, उरण विधानसभा मतदारसंघाचा खराखुरा विकास करण्याचे काम या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार महेश बालदी यांनी केले आहे. …

Read More »

पनवेल महापालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या इमारतीच्या आरेखनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पनवेल : प्रतिनिधी इंटरनॅशनल प्रापॅर्टी ण्ड ट्रॅव्हलच्यावतीने थायलंड येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ’बेस्ट पब्लिक सर्व्हिसेस आर्किटेक्चर इंडिया’ या गटामध्ये हितेन सेठी आर्किटेक्चरच्यावतीने सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनॅशनल …

Read More »

पनवेलच्या चहाविक्रेत्याचा केंद्र सरकारतर्फे दिल्लीत सत्कार

पनवेल : देशमुख प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्ज घेऊन त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केल्याने रस्त्यावर चहा विक्रीचा व्यवसाय करणार्‍या पनवेलच्या रवींद्र मगर यांचा नुकताच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे दिल्लीत सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे ते भारावून गेले. सत्कार समारंभास केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी, प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीचे सचिव …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त 24 जूनला रोजगार महामेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या 24 जून या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार …

Read More »

कर्नाळा बँकेचे संचालक अभिजित पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेचे संचालक अभिजीत विवेकानंद पाटील यांचा बँक गैरव्यवहारप्रकरणी सक्रिय सहभाग दिसून येत असल्याने पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी शुक्रवारी (दि. 9) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अपर्णा वडके यांचाही नियमित जामीन अर्ज या वेळी फेटाळण्यात …

Read More »

उरण विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते करणार भाजपमध्ये प्रवेश

जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये शनिवारी समारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसमावेशक धोरण आणि सक्षम नेतृत्व असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांचा ओढा सातत्याने वाढत आहे. अशाच प्रकारे उरण विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते विकासाचे ‘कमळ’ हाती घेणार आहेत. हा पक्षप्रवेश समारंभ शनिवारी (दि. 10) जेएनपीटी हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता होणार आहे. …

Read More »

आदिवासी शेतकरी बांधवांना भाजीपाला, भात बियाणे वाटप

पनवेल : वार्ताहर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेडच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील लहान धामणी, मोठी धामणी, औशाची वाडी येथील आदिवासी शेतकर्‍यांना भाजीपाला व भात बियाणे वाटप करण्यात आले. ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड आणि सावली संस्था यांच्या माध्यमातून आदिवासी शेतकर्‍यांना नेहमी फायदा होतोय. आता पर्यंत कंपनीच्या माध्यमातून फळझाडे, घरकुल, करोना …

Read More »