बळजबरी गरोदर केल्याचा संतापजनक प्रकार पनवेल : वार्ताहर आपल्याच मावसबहिणीच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केल्याचा संतापजनक प्रकार पनवेल तालुक्यातील जावळे गावात घडला आहे. पीडित मुलीच्या आईने तिला उपचाराकरीता हॉस्पीटल येथे नेल्यावर पिडीत मुलगी ही गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तात्काळ पनवेल …
Read More »पनवेल विभागात 2 एप्रिलला सावरकर गौरव यात्रा
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात गुरुवार (दि. 30)पासून भाजप आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानुसार 2 एप्रिलला पनवेल परिसरात ही गौरव यात्रा होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »शिवकर येथे अज्ञात कारणाने तरुणाची कुर्हाडीने हत्या
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील शिवकर येथे एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने एका अल्पवयीन तरुणाची कुर्हाडीने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ घडली आहे. विनय विनोद पाटील असे या अल्पवयीन तरुणाचे नाव असून त्याची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने कुर्हाडीच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. …
Read More »बंबावीपाडा येथे महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणार्या एका महिला व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री बंबावीपाडा येथे घडली आहे. या घटनेत महिलेच्या पायाला गोळी लागली असून गोळीबार केल्यानंतर अज्ञात इसम पळून गेला. ही घटना समजतात पनवेल शहर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली. पनवेल …
Read More »सीकेटी महाविद्यालयात रंगला जागतिक रंगभूमी दिनाचा सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून सोमवारी (दि. 27) जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सांस्कृतिक विभागद्वारे जागतिक रंगभूमी दिन सोहळा आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नाटक, अभिनय, लेखन आणिदिग्दर्शन यासंदर्भातील अभ्यासक रुची वाढविण्यासाठी हा …
Read More »पनवेलसह परिसरात चोरांचा सुळसूळाट
घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान; प्रभावी उपाययोजनेची नागरिकांमधून मागणी पनवेल : वार्ताहर पनवेलसह परिसरात चोरांचा सुळसूळाट हात आहे. किमती दुचाकी व चारचाकी गाड्या, लॅपटॉप, मोबाईल तसेच रोख रक्कम चोरी झाल्याच्या घटना पनवेल परिसरात सर्रास होताना दिसत आहेत. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना …
Read More »पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री …
Read More »पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री …
Read More »कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी -राज्यपाल रमेश बैस
पनवेलमध्ये विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचे भूमीपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त 15 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मोहिमेची घोषणा केली, ज्यामध्ये त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील 40 कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून आज येथे कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमीपूजन समारंभ दिमाखात होत …
Read More »आकुर्ली येथे दुचाकी अपघातामध्ये एक जण ठार
पनवेल : वार्ताहर आकुर्ली येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोडपाली येथील बाबुराव बुधाजी पगडे (वय 52) हे त्यांची होंडा एक्टिवा मोटरसायकलने (एमएच 46 सीबी 5446) कामावरून घरी येत असताना माथेरान पनवेल मार्गावरील आकुर्ली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper