उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन डंपरच्या जोरदार धडकेत एका डंपर चालकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 348 वरील पागोटे (डीआरटी) परिसरातील मार्गावर मागून येणार्या मातीने भरलेल्या एका डंपरने दुसर्या डंपरला जोराने धडक दिल्याने डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती उरण वाहतूक …
Read More »उरणमधील धुतूम गावात घरफोडी; लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील धुतूम गावातील रहिवासी सुभाष मोतीराम ठाकूर यांच्या राहत्या घरी अज्ञात इसमाने घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार उरण …
Read More »तळोजा रेल्वे स्टेशनसमोरील अपघातात दोघे जण जखमी
पनवेल : वार्ताहर एका लॉरीचालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून गाडीचे मागील चाक मोटरसायकल स्वारावर चढवल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघे जण जखमी झाले असून मोटरसायकलीचेदेखील नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रोडपाली येथे राहणार गोविंदा जैयस्वाल (वय 19) हा त्याचा मित्र साजनकुमार यांच्यासोबत स्कुटर सुझुकी …
Read More »रामबागमध्ये सुरेल गाण्यांची मैफिल
पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या रामबागमध्ये रविवारी (दि. 8) रीदम अॅण्ड रायम या गु्रपच्या वतीने लाईव्ह म्युझीकल इव्हेंट या सुरेल गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेातून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी मस्वर्गसुख आनंद देणारी …
Read More »लेखा शिक्षण आणि संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती
सीकेटी महाविद्यालयात महत्त्वपूर्ण परिसंवाद पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील लेखा विभाग व लेखा आणि वित्त विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत 6 आणि 7 जानेवारीला डिजिटल युगातील लेखा शिक्षण आणि संशोधन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले …
Read More »खारघरमध्ये आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन खारघर : रामप्रहर वृत्त यु नारायण फाउंडेशन आणि अटल फाउंडेशन यांच्या वतीने खारघर सेक्टर 19 येथे मनोज. बी. पाटील यांनी आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. या …
Read More »रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये खाद्य महोत्सव, स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशाच एका खाद्य महोत्सव व स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सोमवारी (दि. 9) करण्यात आले होते.या स्पर्धेचा व खाद्य महोत्सवाचा मुख्य उद्देश वेगवेगळे वनस्पतींचा वापर करून …
Read More »दापोली संघ आमदार चषकाचा मानकरी; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक 2023 टेनिस क्रिकेट स्पर्धेत दापोलीच्या जय हनुमान क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. किरवलीचा ओम नर्मदेश्वर संघ द्वितीय क्रमांक पटकाविला. नावडे येथील मैदानावर चार दिवस या स्पर्धा पार पडल्या. उत्तम आयोजन आणि क्रिकेटचा थरार या …
Read More »पनवेलमध्ये काँग्रेसला झटका; माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया भाजपमध्ये
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश जनरल सेक्रेटरी आणि माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षाची शाल स्वीकारत बांठिया यांनी सोमवारी (दि. 9) पक्षप्रवेश केला. मुंबईतील दादर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात सार्वजनिक …
Read More »छत्रपती संभाजी महाराज कुस्ती संकुलातील आठ जणांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे क्रीडाप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या नितळस येथील छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलातील आठ कुस्तीपटूंची पुणे येथे 10 जानेवारीपासून सुरू होणार्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नयन रवींद्र पाटील (48 किलो वजनी गट), सुशांत नामदेव पाटील (60 किलो), …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper