पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल जवळून जात असलेल्या एका ट्रॅकरखाली रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटर सायकलवरील दाम्पत्य आले होते, परंतु तेथे कर्तव्यावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या सतर्कमुळे त्या दोघांचा जीव बचावला आहे. फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल यंत्रणा विद्युत पुरवठा अभावी बंद …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामांसंदर्भात बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बुधवारी (दि. 17) झालेल्या बैठकित घेण्यात आला. या वेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या. या बैठकीत आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधणे, …
Read More »गणेशोत्सव शांततेत साजरा करा
रसायनी पोलिसांचे आवाहन; मंडळांच्या पदाधिकार्यांसोबत बैठक मोहोपाडा : प्रतिनिधी गणेशोत्सव व इतर सण कायद्याचे पालन करुन शांततेत व गुण्यागोविंदाने साजरे करा, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या शांतता कमिटी, पोलीस पाटील व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकार्यांच्या समन्वय बैठकीत केले. जिल्हा …
Read More »बिअर शॉपीसमोर उघड्यावर बिअर पिणाऱ्या मद्यपींना आवरा
पनवेल : प्रतिनिधी – बिअर शॉप समोरच बिअरचे सेवन करणाऱ्या मद्यपींमुळे परिसर अस्वच्छ होत असून नागरिकांना नाहक त्रास होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून नागरिकांच्या हिताकडे शासनाचे लक्ष वेधले. पनवेल तालुक्यातील कळंबोली, कामोठे येथे परवानग्या देण्यात आलेल्या बियर …
Read More »राज्यातील मंजूर ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : प्रतिनिधी – मुंबईत सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील मंजूर ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीबाबत तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. राज्यातील महामार्गावर होणारे अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता अपघातग्रस्तांसाठी गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय …
Read More »राज्यात “मिशन वात्सल्य” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात तारांकित प्रश्न
पनवेल : प्रतिनिधी – राज्यात “मिशन वात्सल्य” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. राज्यात कोरोना संसर्गाने मातृ-पितृ छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना तसेच कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे कोरोनाने निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या …
Read More »लकी स्पोर्ट अकॅडमीचे मॅरेथॉनमध्ये यश
उरण : रामप्रहर वृत्त उरण येथे झालेल्या जिल्हास्तरीय द्रोणागिरी मॅरेथॉनमध्ये लकी स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. त्यांचे कौतुक होत आहे. 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये पाच किमी शर्यतीत सार्थक संजय पाटील (दिघोडे) प्रथम क्रमांक, मिहीर अनंत माळी (दिघोडे) तृतीय, 14 वर्षाखालील मुलींच्या तीन किमी शर्यतीत दिव्या महेंद्र ठाकूर (धुतूम) …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामधे मंगळवारी (दि.17) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाचा शेवटचा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चोचे अध्यक्ष विनोद घरत, महाविद्यालय विकास …
Read More »पनवेल, उरणमध्ये परिसरात समुह राष्ट्रगीत गायनास प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत बुधवारी (दि. 17) समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आला. पनवेल महापालिका हद्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव …
Read More »नियम पाळून दहिहंडी करा
पोलिसांचे आवाहन; पनवेल, उरणमध्ये बैठक पनवेल : वार्ताहर दहिहंडी सण साजरा करताना नियमाचे पालन करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल शिवराज पाटील यांनी बुधवारी (दि. 17) घेतलेल्या सार्वजनिक दहिहंडी आयोजक बैठकीत केले. दहिहंडी सणानिमित्ताने सार्वजनिक दहिहंडीचे आयोजक यांची पोलीस ठाणे मंथन हॉल येथे पोलीस उप आयुक्त, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper