पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव 2022करीता गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप परवानगी शुल्क, नोंदणी शुल्क व अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी जाहीर केले आहे. सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त नियोजन करण्याच्या हेतूने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके …
Read More »गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू
रसायनी ः प्रतिनिधी आपटा गावातील कुंभार समाजाचे जुन्या पिढीतील मूर्तीकार नारायण वाडेकर व त्यांच्या पत्नी सुमती वाडेकर हे त्यांची मूर्तीकला आजही जपत आहेत. वयाची पंच्याहत्तरीतसुद्धा मूर्ती बनवत आहेत. सध्या त्यांची गणेशमूर्ती बसनविण्यासाठी लगबग सुरू आहे. गावातील तरुण पिढीतील कलाकार प्रसाद टेंबे हे शाडूच्या मूर्ती करून लोकांच्या आवडीप्रमाणे करून देतात. टेंबे …
Read More »मंगळागौरीतून पर्यावरण जागर
पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे उपक्रम पनवेल : प्रतिनिधी संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे मंगळागौरीतून पर्यावरण जागर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश सख्यांना देण्यात आला. नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 60 सख्यांनी या मध्ये सहभाग घेतला या वेळी आयोजित करण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेचे अरुणा बने, मनिषा आपटे आणि वैशाली थोरात विजेते …
Read More »पनवेलमध्ये आदिवासी दिनानिमित्त जनजागृती रॅली
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मालडूंगे, धोदाणी, गाढेश्वर परिसरात मंगळवारी (दि. 9) जागतिक आदिवासी दिनानिमित्त मालडूंगे येथील हुतात्मा नाग्या महादू कातकरी चौक (आदिवासी क्रांतिकारक स्तंभ) येथे क्रांतीकारकांना मानवंदना करण्यात आले. गाढेश्वर येथील ठाकूर समाजाचे क्रांतीकारक पद्या ठाकूर यांनीदेखील मानवंदना करून तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने मालडूंगे, धामणी, देहरंग, बापदेववाडी, धोदाणी …
Read More »दीक्षा वर्तकचे वक्तृत्व स्पर्धेत यश
गव्हाण ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे फुंडे येथे न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विभागीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजची इयत्ता आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी दिक्षा रमेश वर्तक हिने …
Read More »नवी मुंबईत मोबाइल चोरांचे त्रिकूट अटकेत
एक लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर रस्त्यावरून मोबाइलवर बोलत जाणार्याच्या हातातली मोबाइल हिसकावून पळ काढणार्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईच्या पथकाला यश आले आहे. या मोबाईल चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना कोपरखैरणे येथून अटक केली आहे. या तीन आरोपीकडून एक लाख 33 हजाराचा …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पनवेलमध्ये भाजप युवा मोर्चाची बाईक रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी देशवासीय सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन बुधवारी (दि. 10) करण्यात आले होते. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »गव्हाण विद्यालयात राख्यांचे प्रदर्शन
चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त बहीण-भावाच्या पवित्र नात्याची ओळख असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्यांच्या प्रदर्शनाचे बुधवारी (दि. 10) भरविण्यात आले होते. या …
Read More »मंगळागौरीतून पर्यावरण जागर
संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे उपक्रम पनवेल : प्रतिनिधी संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेलतर्फे मंगळागौरीतून पर्यावरण जागर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश सख्यांना देण्यात आला. नागोठणे, उरण, अलिबाग, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 60 सख्यांनी या मध्ये सहभाग घेतला या वेळी आयोजित करण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेचे अरुणा बने, मनिषा आपटे आणि वैशाली थोरात विजेते …
Read More »भाजपतर्फे माजी सैनिकांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका आणि शहर महिला कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने आपल्या भागातील थोर व्यक्ती की, ज्यांनी देशसेवा केली आहे अशा व्यक्तींचा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करावा, असा आमदार प्रशांत ठाकूर यांचा मानस असून त्याप्रमाणे पनवेल शहर आणि तालुका महिला मोर्चातर्फे शहरातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper