Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवारी समूह राष्ट्रगीत गायन

पनवेल मनपाही होणार उपक्रमात सहभागी पनवेल : प्रतिनिधी स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत …

Read More »

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तसेच श्रावणी सोमवार व संकष्ट चतुर्थीनिमित्त केदार भगत मित्र परिवारकडून पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल लिंक आणि पोस्टाची सुकन्या समृद्धी खाते मोफत काढून देण्यात आले. याचा …

Read More »

होपमिरर फाउंडेशनतर्फे मोफत नेत्र तपासणी

पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाउंडेशनने स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्थ नेत्रालय आणि प्रहार ऑप्टिकल यांच्या सहकार्याने धानसर गावात गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि निराधारांसाठी मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तसेच गरजूंना डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रियांवर सवलत देण्याचे ठरवले. या मोहिमेद्वारे होपमिरर फाउंडेशनने गरजूंना त्यांच्या डोळ्यांच्या …

Read More »

प्रजापती समाज विकास मंडळातर्फे महाराजा दक्ष प्रजापती जयंती, स्वातंत्र्य दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजापती समाज विकास मंडळ, नवी मुंबईतर्फे महाराजा दक्ष प्रजापती यांची जयंती आणि स्वातंत्र्यदिन सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महाराज दक्ष प्रजापती यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी ‘जय जय …

Read More »

उरण येथे स्वातंत्र्य दिन साजरा

उरण : वार्ताहर भारतीय स्वातंत्र्य दिन उरण शहरात सर्वत्र साजरा करण्यात आला. उरण नगर परिषद कार्यालयासमोर प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळेस तंबाखू मुक्त अशी शपथ देण्यांत आली. त्याच प्रमाणे नगर परिषद भवरा समाज मंदिर, प्राथमिक शाळा क्र. 1 व 2, प्राथमिक शाळा मोरा …

Read More »

उरण येथे आमदार चषक जलतरण स्पर्धेस प्रतिसाद

उरण : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, हौसी जलतरण संघटना आणि आलोक अ‍ॅक्वा इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथे रविवारी (दि. 15) आमदार चषक जलतरण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत नऊ गटांमध्ये 210 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका …

Read More »

अमर पाटील यांच्याकडून निवृत्त जवानांचा गौरव

कळंबोली : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती अमर पाटील यांच्या वतीने निवृत्त जवानांचा गौरव कळंबोली येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात अती उत्साहात करण्यात आला. यावेळी नवी मुंबई, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा येथून 40 निवृत्त जवानांनी उपस्थित लावली होती. या वेळी निवृत्त जवानांनी आपल्याला …

Read More »

पनवेल स्टेशनमध्ये लवकरच नवा पादचारी पूल

पनवेल : वार्ताहर वाढत्या प्रवासी संख्येमुळे पनवेल रेल्वेस्थानकावर असलेले पादचारी पूल कमी पडू लागले आहेत. पुलावर होणारी गर्दी पाहता पनवेल रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसप्रमाणे पनवेल रेल्वेस्थानकाचा विकास केला जाणार आहे. पनवेल रेल्वेस्थानकामध्ये सध्या सात फलाट आहेत. त्यातील चार उपनगरी, तर तीन लांब पल्ल्याच्या …

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त खारघरमध्ये रक्तदान शिबिर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघर युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली, तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले. खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक …

Read More »

उरण येथे पाण्यामध्ये ध्वजारोहण आणि संचलन

आमदार महेश बालदी यांची संकल्पना उरण : वार्ताहर स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त उरण येथे रविवारी (दि. 14) मध्यरात्री 12 वाजल्यानंतर नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोनी पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन तसेच राष्ट्रगीत सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन उरणचे आमदार महेश बालदी मित्र मंडळ यांनी केले. उरणमधील श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये …

Read More »