उरण ः वार्ताहर, बातमीदार तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी गुरुवारी (दि. 12) स्फोटकसदृश्य वस्तू समुद्रकिनारी आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस समुद्रकिनारी दाखल झाले. दरम्यान, दोन कांड्यांचा स्फोट झाल्याने किनार्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. समुद्रकिनारी शोध घेतला असता परिसरात 23 स्फोटक कांड्या आढळून आल्या आहेत. या वेळी, मोरा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नावडे फाटा येथे उड्डाणपूल
पूल वाहतुकीसाठी खुला; युवकांनी केले उदघाटन पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून नावडे फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येथील युवकांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून हा पूल मार्गस्त झाला आहे. पनवेल-मुंब्रा मार्गावर …
Read More »गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त
पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या सर्कलजवळ एक व्यक्ती गावठी बनावटीचे चार पिस्तुल व चार जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2ला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गोपाल राजपाल भारद्वाज (वय 22, रा. नवोदय नगर, टेहरी, उत्तराखंड) याला अटक करण्यात आली आहे. पनवेल रेल्वे स्थानक …
Read More »कामोठे वसाहतीत महिला असुरक्षित
पायी चालत जाताना बॅग, चैन हिसकावल्याचे प्रकार ; दोन दिवसांत दोन घटना घडल्या पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीतील 33 वर्षीय महिला रस्त्याने पायी आपल्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्या महिलेची हातामधे असलेली बॅग हिसकावल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. तर दुसर्याच दिवशी एका महिलेच्या गळ्यातील चैन व लॉकेट …
Read More »…तर केव्हाही सिडको कार्यालयात घुसू
– भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा इशारा; – मानसरोवर रेल्वेस्टेशनजवळील काम बंद करण्यासाठी दिली धडक पनवेल ः प्रतिनिधी सिडकोने 31 मेपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करावे अन्यथा आम्ही तारीख जाहीर करणार नाही, मनात येईल तेव्हा सिडकोमध्ये घुसून सिडकोच्या अधिकार्यांना सळो की पळो करून सोडू, असा गर्भित इशारा भाजपचे …
Read More »भंगार गोळा करणार्यांकडून घडले माणुसकीचे दर्शन
उरण : बातमीदार उरण तालुक्यात भंगार व कचरा गोळा करणार्या दोघांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना उरणमध्ये घडली आहे. सविस्तर घटना अशी की, 7 मे रोजी मासेमारी व्यवसाय असणार्या करंजा कासवले पाडा येथील रहिवासी 33 वर्षीय सुशाली धनंजय नाखवा यांची 10 वर्षीय मुलगी विधी धनंजय नाखवा हीची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार …
Read More »खानावमध्ये 82 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत खानाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि जलजीवन मिशन अंतर्गत विहिर बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि. 11) झाला. …
Read More »विवेक पाटलांचा आणखी 47 कोटींचा घोटाळा उघड
सात बोगस कर्ज खाती; मनमानी कारभाराचा नमुना पनवेल : रामप्रहर वृत्त शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांनी केवळ ६३ बोगस कर्जखातीच नाहीत तर आणखी सात बोगस कर्जखात्यांतील कोट्यवधींवर डल्ला मारल्याचे कर्नाळा बँकेचे प्रभारी सीईओ प्रवीण रामभाऊ म्हात्रे यांनी ईडीला दिलेल्या जबाबातून पुढे आले आहे. ६३ …
Read More »तक्का येथे शासकीय दाखले वाटप शिबिर
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त जून महिन्यांमध्ये शाळा सुरू होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरीता लागणारे दाखले गोळा करण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ होते. याअनुषंगाने भारतीय जनता पक्ष तक्का व एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आधारकार्ड व शासकीय दाखले वाटप शिबिर बुधवारी (दि. 11) आयोजित …
Read More »हे तर शिक्षकांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम
पनवेलचे गटशिक्षण अधिकारी आणि त्यांच्या सहकार्यावर कारवाई करा -प्रकाश बिनेदार पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षकांच्या व्यक्तीगत हक्कावर गदा आणण्याचे काम करणारे पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मनिष खामकर आणि त्यांचे सहकारी सिताराम मोहिते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी पंचायत समितीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper