Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

हिंद टर्मिनल लॉजिस्टिकच्या 600 कामगारांचा प्रश्न मार्गी

आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत दिल्लीत बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्त सीडब्ल्यूसी हिंद टर्मिनल कोणत्याही परिस्थितीत बंद पाडू नका, असे निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सीडब्ल्यूसी लॉजीस्टिक पार्क (हिंद टर्मिनल)चे डायरेक्टर अमित कुमार यांना दिले आहेत. हिंद टर्मिनल लॉजीस्टिकमधील 600 …

Read More »

पनवेलमध्ये सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र

नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिसानमित्त उपक्रम पनवेल ः वार्ताहर रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा कार्यतत्पर नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 22) सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र, योजना आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. …

Read More »

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या नेतृत्वाखाली भिमोत्सव उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त आपल्या भारत देशाला अधिक बलवान बनवायचे असेल तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळ धारदार बनवून देशात समता, बंधुत्व, न्याय व विज्ञानाचा पुरस्कार करणे हे प्रत्येक आंबेडकरी अनुयायाचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पुर्णपणे पार पाडण्यासाठी अनुयायांनी झटले पाहिजे, …

Read More »

मनमौजी माउंटेनियर्सने पाच दिवसात पाच सुळके सर केले

मोहोपाडा ः प्रतिनिधी चौक, रसायनी, पनवेल विभागातील मनमौजी माउंटेनियर्सने पाच दिवसात पाच सुळके सर करून गडप्रेमींना अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे माउंटेनियर्स यांच्यात उत्साह वाढला आहे. इर्शाळगड, तेल बैला डावा, तेल बैला उजवा, कल कराई, वजीर सुळका हे पाच कठीण सुळके रसायनीतील विनयप्रताप हनुमंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसात चढून …

Read More »

उलवे येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण

उरण ः बातमीदार अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये अर्थ डे ही सर्वप्रथम संकल्पना मांडली. त्यानुसार 22 एप्रिल हा दिन जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभर साजरा होत असतो. उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने स्थानिक परिसंस्थेला उपयुक्त असणार्‍या देशी वृक्ष लागवड करुन जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. …

Read More »

उरण आगारातील 90 टक्के बससेवा पूर्ववत

181 कर्मचारी पुन्हा कामावर हजर उरण ः वार्ताहर मुंबई विभागाच्या उरण आगारात संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे पुनरागमन झाले आहे. आगारातील 193 कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ 181 कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यामूळे 90 टक्क्यांहून अधिक बससेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण आगाराचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2021पासून राज्यातील एसटी …

Read More »

पनवेलमध्ये संजय गांधी निराधार योजना समिती गठीत

एकूण 53 प्रकरणे मंजूर पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 20) तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संजय …

Read More »

पनवेल प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नालेसफाई

नगरसेवक विक्रांत पाटील यांची कार्यतत्परता पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिका प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नाले आणि गटारांची दूरवस्था झाली होती. याबाबत नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे नागरिकांनी तक्रार करताच त्यांनी तातडीने या भागातील नालेसफाई करून घेतली. पाडा मोहल्ल्यात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक …

Read More »

‘सीकेटी’च्या एनसीसी विभागातर्फे शहिदांना नमन

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय कॅडेट्स कोप्स (एनसीसी)च्या शहिदांना शतश: नमन कार्यक्रमांतर्गत 8 महाराष्ट्र गर्लस बटालियन मुंबई गट व सीकेटीच्या एनससीसी विभागातर्फे शहीद नाईक हनुमंत कदम यांचे भाऊ श्रीकांत कदम यांना कृतज्ञता फलक प्रदान केले. कर्नल एम. एल. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली स्मृतिचिन्ह आणण्यात आले. शहीद नाईक हनुमंत कदम यांना 17 …

Read More »

भाजप खोपटे गाव अध्यक्षपदी नवनाथ ठाकूर

उरण ः बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथा खोपटे गावचे सुपुत्र नवनाथ नारायण ठाकूर यांची खोपटे गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना दिले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. …

Read More »