Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

जेएनपीटीच्या नव्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या नियुक्त्या

उरण ः वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टऐवजी नव्याने स्थापन झालेल्या मेजर पोर्ट अ‍ॅक्टनुसार बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 12 सदस्यांपैकी सात सदस्यांच्या नियुक्तया केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाचे जांईट सेक्रेटरी विक्रम सरकार यांनी जाहीर केल्या आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टऐवजी आता नव्याने मेजर पोर्ट अ‍ॅक्ट अस्तित्वात आला आहे. त्यामुळे जुना अस्तित्वात …

Read More »

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकाची शिळफाटा येथे कारवाई, पावणेसहा लाखांचा साठा हस्तगत; दोघे ताब्यात

पनवेल ः वार्ताहर अमली पदार्थविरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा परिसरातील शिळफाटा येथून जवळपास पाच लाख 89 रुपयांचा अमली पदार्थ, रोख रक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. अमिन जाल मोहम्मद खान व बदरली इर्शाद अहमद शेख यांच्याकडे मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ …

Read More »

गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे आदरांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त गानसम्राज्ञी भारतरत्न, स्व. लता मंगेशकर यांना भाजप कामोठे मंडलतर्फे सोमवारी (दि. 7) पोलीस ठाण्यासमोरील चौकात  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी,  सरचिटणीस शरद जगताप, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भटके विमुक्त जमाती महिला सेलच्या उत्तर …

Read More »

एक लाखासाठी आईने पोटच्या मुलाला विकले; पनवेल पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत आरोपी गजाआड

पनवेल ः संजय कदम ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मुलाला विकल्यानंतर स्वत: आईनेच पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर …

Read More »

‘टाटा स्टील’कडून आदिवासी पाड्यांना दिलासा

पनवेल : रामप्रहर वृत्त टाटा स्टीलने निफानवाडी या आदिवासी पाड्याचे रूप पालटून टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. निफानवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील टाटा स्टीलच्या सावरोली पंचायत प्रकल्पाच्या नजीक आहे. या निवासी पाड्यामध्ये 22 झोपड्या असून सध्या या एकूण वस्तीची अवस्था फारच बिकट झालेली होती. विशेषतः …

Read More »

खारघरमध्ये सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग 6चे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर 18 मधील त्रिकोना पार्क येथे रविवारी (दि. 6) सामुदायिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले गेले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात 75 कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ आयोजित केले जात आहेत. विद्या भारतीची उपकंपनी संस्था क्रीडा भारती, विद्यार्थी परिषद, राष्ट्र …

Read More »

ई-श्रम आणि युनिव्हर्सल कार्ड शिबिर

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील प्रभाग क्र.34 भाजप अध्यक्ष अ‍ॅड. गणेश रसाळ यांच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड आणि रेल्वे प्रवासाकरिता युनिव्हर्सल कार्ड काढून देण्याचे शिबिर रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. नेरूळ सेक्टर-8 येथील भाजप कार्यालयात झालेल्या या शिबिराचा लाभ सुमारे 400 गरजूंनी घेतला. या वेळी माजी महापौर …

Read More »

भातशेतीचे क्षेत्र होतेय कमी

उरणमध्ये 11 हजारांपैकी फक्त अडीच हजार हेक्टरवर लागवड उरण : रामप्रहर वृत्त पन्नास वर्षांपूर्वी उरण तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर येथे अनेक उद्योग तसेच नागरिकरण वाढत गेल्याने हळूहळू भातशेतीचे क्षेत्र कमी होत गेले. आता तालुक्यात 11 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी फक्त दोन हजार सेक्टरवर भात …

Read More »

शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा; खारघरमधील प्रकार, महिलेने केली तक्रार

पनवेल ः प्रतिनिधी शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरमधील माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्याविरोधात खारघरमधील एका महिलेने विनयभंग केल्याची तक्रार केली असून घरकाम करणार्‍या या महिलेचे आणि तिच्या मित्राचे खाजगी फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बबन पाटील हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात कर्करोग दिनानानिमित्त ऑनलाइन अतिथी सत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त 04 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने महाविद्यालयीन  विद्यार्थी-विद्यार्थीनीमध्ये कर्करोग तथा विशेषत्वाने स्तनांचा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराबद्द्ल जागरूकता निर्माण करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यु पनवेल (स्वायत्त) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »