पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांनी गुरुवारी (दि. 13) आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी गायकर व सहकार्यांचे पक्षात स्वागत केले. …
Read More »सुभाष भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांचा वाढदिवस मंगळवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथे नॅशनल हेल्थ कार्ड आणि ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, …
Read More »उपमहापौर सीताताई पाटील यांनी स्वीकारला पदभार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीताताई पाटील, स्थायी समिती सभापतीपदी अॅड. नरेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी हर्षधा उपाध्याय यांची निवड झाली. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी बुधवारी (दि. 12) आपल्या दालनात पदग्रहण करून आपला पदभार स्वीकारला त्यानिमित्त महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या विजेत्यांचा भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन होणार सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडल्या असून अंतिम फेरीसाठी 25 एकांकिकांची …
Read More »पनवेल भाजप ओबीसी मोर्चातर्फे मानवी साखळी आंदोलन करून पंजाब सरकारच्या या कृतीचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी रोजी पंजाबच्या दौर्यावर असताना तेथील काँग्रेस सरकारने सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्या. सुरक्षेत केलेली कुचराई व कट कारस्थान रचुन केलेल्या चुकीमुळे पंजाबमधील काँग्रेस सरकारचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्च्याच्या …
Read More »गुरुवारी मर्यादित स्वरुपात भूमिपुत्र निर्धार परिषद
पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी गुरुवारी (दि. 13) कोल्ही कोपर येथे भूमिपुत्रांची निर्धार परिषद आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने जाहीर केल्याप्रमाणे ही परिषद कोविडचा प्रोटोकॉल पाळून मर्यादित स्वरूपात होणार आहे. या परिषदेला पनवेल, उरण विभागातील प्रमुख कार्यकर्ते …
Read More »गव्हाण विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनियर कॉलेजमध्ये स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे …
Read More »अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ; मुंबई केंद्रासाठीच्या प्राथमिक फेरीला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची मुंबई केंद्रासाठीची प्राथमिक फेरी नुकतीच सीकेटी महाविद्यालयात …
Read More »पनवेल परिसरात कोल्ह्याचा मुक्तसंचार; आठ ते 10 जण जखमी
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात कोल्ह्याचा मुक्तसंचार होत असून त्याने आठ ते 10 जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे. मोसारा, मानघर, कुंडेवहाळ परिसरातील गावांमध्ये कोल्ह्याचा मुक्त वावर आहे. या कोल्ह्याने जखमी केलेल्यांमध्ये लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper