पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’नुसार भाताण गावात 71 लाख 57 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1) सायंकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. भाताण गावात होणार्या या योजनेचे भूमिपूजन …
Read More »नववर्षाचा उत्साह, मात्र झपाट्याने वाढणार्या कोरोनामुळे चिंता
पनवेल : राज्यात सर्वजण नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना कोरोनानेही डोके वर काढले आहे. कोरोनाचे निर्बंध असले तरी नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेकांनी नववर्षाचे स्वागत घरात राहून करणेच पसंत केले. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्या वाढून तो आकडा आठ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे …
Read More »‘भाजयुमो’तर्फे विद्यापीठ कायद्याची होळी
पुणे : विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने राज्यव्यापी काळे विधेयक होळी आंदोलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी करण्यात आली. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून आता या पुढे या आंदोलनाची मालिका चालवली जाणार आहे. यावेळी …
Read More »उलवे नोडमध्ये आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळण्यास सुरुवात
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; मेडरीका क्लिनिकचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या सुख सुविधा मुंबईमध्ये मिळणार नाही त्या सुविधा विषेश करून आरोग्याच्या बाबतीतील सुविधा उलवे नोडमध्ये मिळण्यास सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 31) उलवे नोड येथे केले. ते उलवे नोड येथील …
Read More »रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील सर्व रिक्षा चालकांनी गणवेश परिधान केल्याचे पाहायला मिळालेे. तसेच सर्व वाहतूक नियमांचे पालन होत असल्याचे गुरुवारी (दि. 30)पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी रिक्षा थांब्यावर अचानक दिलेल्या भेटीत पहावयास मिळाले. मागील काही दिवसांपूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या रिक्षा चालकांवर नवी मुंबई वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम …
Read More »पनवेलमधून 50 लाखांचा अंमली पदार्थ हस्तगत
गुन्हे शाखा कक्ष 3ची धडक कारवाई पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलच्या पथकाने धडक कारवाई करीत तालुक्यातील नेरे वाजे रोडवर एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 50 लाखांचा मेथ्यॉक्युलॉन पावडर (एमडी) हा अंमली पदार्थ तसेच सोबत त्याच्याकडे असलेली मारुती गाडी, मोबाइल फोन व रोख रक्कम असा मिळून जवळपास …
Read More »15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नवी मुंबई पालिका सज्ज
पनवेल : वार्ताहर ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन कोविड व्हेरिएंटचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. याअनुषंगाने महापालिकेमार्फत लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने बैठक घेत या लसीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून कोन-सावळे रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सोमाटणे पेट्रोलपंप या ठिकाणी हा सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा : 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सूचनेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे. पनवेल येथील कर्नाळा बँकेच्या अध्यक्ष व संचालकांनी हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे उघडकीस आले …
Read More »जगदिश गायकवाड यांच्या ‘भीमालय’चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा स्थायी समितीचे विद्यमान सदस्य जगदिश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 29) त्यांनी कामोठे येथे ‘भीमालय’ हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper