दोन दिवसांत तोडगा काढण्याचे प्रशासनाकडून आश्वासन पनवेल ः वार्ताहरकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एव्हाना केवळ शासकीय दप्तरी नोंद करण्याइतपत शिल्लक राहिलेला आहे. बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका या ठिकाणी निर्बंध हटविल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका लेवल-3मध्ये असल्याने व्यापार्यांना जाचक निर्बंधांना सामोरे लावे लागत आहे. या विरोधात …
Read More »राज्य सरकारने केला शिक्षणाचा खेळखंडोबा
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करून विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीवर ठेवणार्या ठाकरे सरकारने अकरावी प्रवेशाच्या घोळात आता शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची भर घातली असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा चंग आघाडी सरकारने बांधला आहे, अशी टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या नगरसेवक निधीतुन विकास कामांना सातत्याने प्राधान्य देत प्रभागात नवनवीन सुधारणा घडवून आणणारे पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. 17चे भाजपचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी नगरसेवक निधीतुन शिवाजी नगर, पनवेल एस. टी. डेपोच्या बाजुला, पनवेल रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी उभारलेल्या सार्वजनिक सभागृहाचे तसेच बोअर वेलचे (हातपंप विहीर) …
Read More »भाजप कार्यकर्ते अविनाश म्हात्रे यांचे निधन
नावडे परिसरात हळहळ व्यक्त पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अविनाश लक्ष्मणशेठ म्हात्रे (नावडे, ता. पनवेल) यांचे बुधवारी (दि. 11) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. त्यांचे वडील ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ यांचे 5 ऑगस्ट रोजी, तर आईचे 18 जुलै रोजी निधन झाले होते. या आघातामुळे त्यांच्या कुटुंबावर …
Read More »कोशिश फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण
पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी येथील आयकर भवनजवळ करण्यात आला होता. या अभियानांतर्गत …
Read More »नागाची मूर्तिकला जिवंत ठेवणारे चिरनेरचे गोरे कुटुंब
उरण : वार्ताहर नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. यावर्षी शुक्रवारी (दि. 13) नागपंचमी उत्सव आला आहे. त्यामुळे चिरनेर कलानगरातील गोरे कुटुंबांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागदेवताच्या मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. नागपंचमीच्या दिवशी सुहासिनी या …
Read More »खांदा कॉलनीत सशक्त बुथ अभियान आढावा बैठक
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने खांदा कॉलनी महिला मोर्चाची बैठक मंगळवारी (दि. 10) खांदा कॉलनीमधील सेक्टर 1 येथे आमदार प्रशांतदादा ठाकूर जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत समर्थ बूथ अभियान व इतर काही विषय या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. सर्व बूथ यादीचा आढावा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
संकल्प फाऊंडेशन व संस्कार अॅक्टिविटी सेंटर यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात पनवेल : प्रतिनिधी संकल्प फाऊंडेशन व संस्कार अॅक्टिविटी सेंटर कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबविण्यात आला. गेल्या आठवड्यात महाड परिसरात महापुराने सगळेच उद्ध्वस्त केले आहे. दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या ढालकाठी, बिरवाडी, भावे, …
Read More »कामगार नेते जितेंद्र घरत यांचा वाढदिवस साजरा
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण उरण : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते जतेंद्र घरत यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त त्यांना उरणचे आमदार महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इंडियन ऑईलटॅकिंग लिमिटेड नवघरच्या …
Read More »दुकाने सुरळीत ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
कामोठे ः प्रतिनिधी सलग दोन वर्षे व्यापारी, दुकानदार हे लॉकडाऊन, निर्बंधांमुळे परेशान झाले असून दुकानाचे भाडे, लाईट बिल, कर्ज, खर्च यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून 11 ऑगस्टपासून दुकाने दररोज सुरळीत चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कामोठे शहर व्यापारी महामंडळ असोसिएशनने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper