Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरणमध्ये कोरोनाची उसळी; वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालये हाऊसफुल्ल

उरण : वार्ताहर नागरिकांचा बेफिकीरपणा, सण, समारंभात शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून होणारी गर्दी आणि कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही फक्त भीतीमुळे रुग्णांकडून उपचारासाठी होत असलेली अक्षम्य टाळाटाळ, यामुळे उरणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांमुळे सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात रुग्णांना बेडही उपलब्ध …

Read More »

कामोठ्यात ज्वेलर्स मालकाकडून फसवणूक; गुन्हा दाखल; शोध सुरू

पनवेल : वार्ताहर कामोठे भागातील एका ज्वेलर्स दुकान मालकाने दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने कामोठे भागातील आठ व्यक्तींजवळचे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन आपले दुकान बंद करून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष पवार असे या ज्वेलर्स दुकान मालकाचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याच्यावर फसवणकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून …

Read More »

रसायनीतील भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

रसायनी ः रामप्रहर वृत्त रसायनी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, त्यांना आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शनिवारी (दि. 3) रसायनी परिसराचा दौरा करून सक्रिय भाजप कार्यकर्त्यांची पदावर …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते तेलीपाडा गावात विकासकामांचे उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील तेलीपाडा गावातील स्मशानभूमी रोडच्या डांबरीकरण कामाचे आणि गावातील साई मंदिर ते होल्डिंग पॉइंटपर्यंतच्या अंडरग्राऊंड गटाराच्या कामाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) करण्यात आले. गावातील स्मशानभूमी रोडची दुरवस्था झाली होती. रस्त्याला अनेक लहान-मोठे खड्डे पडलेले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास …

Read More »

बॅग, मोबाइल चोरटा पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून मुंबईला रवाना होणार्‍या कोईम्बतुर एक्सप्रेसमधील प्रवाशाची बॅग आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील सी डब्ल्यू ऑफिसमधील कर्मचार्‍याचा मोबाइल पळवणार्‍या आरोपीस पनवेल रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. कोईम्बतुर एक्सप्रेसमधून प्रवाशाची 30 हजार रुपयांसह एकूण 35 हजारांचा ऐवज असलेली बॅग पनवेल स्टेशनवरून गाडी सुटताना …

Read More »

जेएनपीटीत वर्षभरात सर्वाधिक कंटेनरची हाताळणी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा उरण, नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. या बंदरामध्ये गेल्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21च्या आर्थिक वर्षात सर्वाधिक कंटेनची हाताळणी केली आहे. यामध्ये 7.7 दशलक्ष टीईयू (वीस फूट समकक्ष युनिट्स) ची हाताळणी केली.  टीईयू (ट्वेन्टी फून …

Read More »

आपटा नदीपात्रात होड्या आणि पोहण्याच्या शर्यती

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील आपटा कोळी बांधवांकडून पाताळगंगा आपटा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती झाल्या. या स्पर्धेत चार होड्या सहभागी झाल्या होत्या. ही शर्यत श्री गणपती मंदिर ते श्री बापुजी मंदिर यानंतर पुन्हा श्री गणपती मंदिर अशी झाली. या होड्यांच्या शर्यतीत पहिला क्रमांक जगन पाटील ग्रुपने पटकाविला, तर दुसरा क्रमांक पदा …

Read More »

उरणमध्ये गॅसची पाइपलाइन फुटली

उरण : वार्ताहर उरण चारफाटा जवळील एमटीएनएलच्या केबल दुरुस्तीचे काम सुरू असतानाच शनिवारी (दि. 3) दुपारच्या सुमारास महानगर गॅसची पाइपलाइन फुटली. वेळीच गॅसची पाइपलाइन बंद करण्यात यश आल्याचे पुढील अनर्थ टळला. उरण तालुक्यातील ओएनजीसी-चारफाटा रस्त्यावर एमटीएनएलचे दुरुस्तीचे काम सुरू होते. केबल दुरुस्तीसाठी  खोदाईचे काम सुरू असतानाच जेसीबी मशीनच्या बकेटचा धक्का …

Read More »

कळंबोलीतील पावसाळी गटारांत मलमिश्रित पाणी

समस्येसंदर्भात दखल घेण्याची मागणी पनवेल : वार्ताहर कळंबोली सेक्टर 14 येथील पावसाळी बंदिस्त गटारे साफ केली असली तरी त्याच्यामध्ये मल मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या सदनिकाधारकांचे आरोग्य धोक्यात आहे. ही समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केली आहे. यासंदर्भात सिडकोच्या कार्यकारी अभियंता यांना …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रिक्षा संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

रसायनी ः रामप्रहर वृत्तवंदे मातरम जनरल कामगार संघटनेंतर्गत रसायनी रेल्वेस्थानक येथील जयहिंद रिक्षा चालक मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) करण्यात आले.भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी प्रमुख सल्लागार असलेली वंदे मातरम जनरल कामगार संघटना …

Read More »