आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीवजा सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीत कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेता कोविड रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदनाद्वारे मागणीवजा सूचना केली आहे.या …
Read More »गरजूंना घरी जाण्यासाठी मोफत रिक्षासेवा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साजर्या करण्यात येणार्या कार्यक्रमाअंतर्गत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे रोज 70 गरजवंत कामगारांना घरी सोडण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. गुरुवारपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत मोफत रिक्षासेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची …
Read More »उरणमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण : वार्ताहर देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमांचे पालन आणि कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर उरणमध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. उरणमध्ये आतापर्यंत 3930 जणांचे लसीकरण झालेले असून दररोज 100 जणांना डोस …
Read More »खारघरमध्ये पार्लरवर कारवाई; मसाजच्या नावाखाली अनैतिक धंदे उघड
पनवेल : वार्ताहर मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविल्या जाणार्या खारघर सेक्टर-3 मधील शगुन फॅमिली स्पावर खारघर पोलिसांनी छापा मारून मसाज पार्लर चालक मालक व मॅनेजर या तिघांवर पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे सदर मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या दोन मुलींनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खारघर …
Read More »गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नियमावली; कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास होणार दंडात्मक कारवाई
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिका क्षेत्रातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांवर कोरोना प्रतिबंधक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांनी कोरोना नियंत्रण करणार्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या पदाधिकारी-सदस्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अनेक वेळेला सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील कोरोना रुग्ण बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळत आहेत. या …
Read More »नवीन पनवेलमध्ये बसविली पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन; सभापती सुशीला घरत यांचे प्रयत्न
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत यांच्या माध्यमातून नवीन पनवेल मधील सेक्टर 14 येथील ओम अपार्टमेंट ओनर्स असोसिशन ई-1 मधील बिल्डिंग क्रमांक 11, 12 व 13 मध्ये पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन बसविण्याच्या कामाचे शुभारंभ …
Read More »लॉकडाऊनला वाढता विरोध
मोहोपाड्यात व्यापार्यांचे ठिय्या आंदोलन; ठाकरे सरकारचा जाहीर निषेध मोहोपाडा ः प्रतिनिधीकोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले आणि प्रत्यक्षात मात्र ’ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापार्यांचा आहे. वीकेण्डला कडक लॉकडाऊन असताना त्याआधीच दुकानांचे शटर खाली करायला लावल्याने मोहोपाडा, नवीन पोसरी व वावेघर बाजारपेठेतील व्यापारी नाराज …
Read More »भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागरिकांना लाडू, पन्हे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन मंगळवारी (दि. 6) साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पटवर्धन हॉस्टिपलमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना नगरसेविका दर्शन भोईर यांनी लाडू आणि नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पन्हे वाटप केले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड …
Read More »पनवेलकरांच्या ‘जेजे’मध्येही होणार कोरोना चाचण्या
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. संशयित रुग्णांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या अहवाल अलिबाग येथील शासकीय लॅबमध्येमधून येण्यास उशीर होतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाद्वारे दैनंदिन 500 कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या आता जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात येणार आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णासांठी …
Read More »पनवेलकरांना मालमत्ता करात दिलासा
40 ते 50 टक्के सूट द्या! महापौरांचे प्रशासनाला निर्देश पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेत विकासकामे करण्यासाठी आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेला कर लावणे आवश्यक आहे, पण तो कर नागरिकांवर अन्यायकारक नसावा. वार्षिक भाडेमूल्य 50 टक्के कमी करून आणि इमारतींना घसारा लावून कर आकारावा. सिडको वसाहतीतील नागरिकांनी सिडकोला दिलेला सर्व्हिस टॅक्स कमी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper