पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल या स्वच्छता अभियान मोहिमेद्वारा नवीन पनवेल सेक्टर 04, द्वारका स्विट मार्ट समोर आपले घर, आपल्या घरासभोवतालचा परिसर व आपले पनवेल शहर कशाप्रकारे स्वच्छ व सुंदर ठेवावे. याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यासाठी एक पथनाट्य सादर करण्यात आले. हे पथनाट्य ठाणे येथील …
Read More »उरणमध्ये तनिष्क ज्वेलरीचे प्रदर्शन
उरण : वार्ताहर उरणमध्ये प्रथमच तनिष्क ज्वेलर्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्वेलरी ब्रँडचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 29, 30, 31 जानेवारीदरम्यान असलेले हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उरण येथील आनंदी हॉटेल येथे खुले आहे. तनिष्कचे नामांत कीत अतिशय सुंदर आणि सुबक सोन्याचे दागिने 18 कॉरेट 22 कॉरेटचे दागिने …
Read More »नाट्य परीक्षण समितीवर शामनाथ पुंडे
पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेंतर्गत नाट्य परीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अशासकीय सदस्यपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह शामनाथ पुुंडे यांची नियुक्ती झाली आहे.या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार …
Read More »महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त जासई विद्यालयात अभिवादन
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. या वेळी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर …
Read More »गाड्या रजिस्ट्रेशन करून देतो सांगून फसवणूक करणार्या चौघांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर बीएस-4 इंजिन मेकच्या नवीन गाड्या हरियाणा येथून रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगून पाच गाड्यांसाठी आरटीजीएसद्वारे एकूण 27 लाख 20 हजार रुपये बँक खात्यात घेतले. तसेच या गाड्या रजिस्टर करून न देता अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याबद्दल चार जणांविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …
Read More »‘रोटरी’तर्फे आत्मनिर्भर बोंदारपाडा अभियान
पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि भारत विकास परिषद शाखा पनवेल या समाजसेवी संस्थांकडून बोंदारपाडा हे आदिवासी गाव दत्तक घेऊन त्याचे आत्मनिर्भर बोंदारपाडा करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे. वाडीतील आदिवासी बांधवांना स्वयंरोजगार म्हणून कुठले व्यवसाय शिकण्यास आवडेल या संदर्भात …
Read More »श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील रसायनी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतीय बौध्द महासभा रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्याच्या वतीने मंगळवारी (दि. 26) आयोजित केलेल्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक तथा सभापती प्रकाश बिनेदार उपस्थित होते. या वेळी जगाला शांततेचा संदेश देणार्या तथागतांच्या बौध्द …
Read More »भाजप खारघर कार्यालयास सदिच्छा भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारत सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेश पिल्लई, राज्य दक्षिण भारत महिला अध्यक्ष ज्योती अय्यर आणि महाराष्ट्र राज्य दक्षिण भारतातील काही मुख्य सदस्यांनी खारघर येथील भाजप कार्यालयास शुक्रवारी (दि. 29) सदिच्छा भेट दिली. भाजप खारघर तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत केले. …
Read More »उरणमध्ये कोविड लसीकरणाला सुरुवात
उरण : वार्ताहर उरण तालुक्यात कोविड लसीकरण गुरुवारी (दि. 28) सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यातील या लसीकरणाची सुरुवात अंगणवाडी सेविकांपासून करण्यात आलीआहे. रायगड जिल्ह्यामध्ये सात केंद्राच्या माध्यमातून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये उरण तालुक्यासाठी सिडको ट्रेनिंग सेंटर (बोकडवीरा-उरण) येथे लसीकरणाला सुरुवात झाली आहे. उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत …
Read More »पेटीएम अकाऊंटवरून फसवणूक करणार्यास बेड्या
पनवेल : वार्ताहर माझ्या मोबाइलचा बॅलेन्स संपला आहे असे सांगून फिर्यादी यांचा मोबाइल घेऊन फिर्यादी यांचे पेटीएम अकाऊंटवरून स्वतःचे अकाऊंटवर 60 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करणार्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. फिर्यादी संजय छेडीलाल रावत याचा मोबाइल आरोपी विजय राकेश सिंग (वय 25, रा. सुरतपूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper