Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आठवडा बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ; कारवाईची मागणी

पनवेल : बातमीदार नवीन पनवेल सेक्टर 5 डी मार्टसमोर व सेक्टर 1 परिसरात आठवडा बाजारामध्ये शुक्रवारी (दि. 27) येथून एका व्यक्तीच्या खिशातून 12 हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला आहे. यापूर्वीदेखील या बाजारात आलेल्या नागरिकांच्या वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. दर …

Read More »

उरणमध्ये आचार्य अत्रे कट्टाचा कार्यक्रम

चिरनेर : प्रतिनिधी रायगड जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटना संचलित, आचार्य अत्रे कट्टा कार्यक्रम नुकताच उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व कट्ट्याचे अध्यक्ष धनंजय गोंधळी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय गायकवाड हे उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणार्‍या सभासदांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये …

Read More »

घारापुरी बेटावर पर्यटकांची लूट, खाद्यपदार्थांवर अधिक कर आकारणीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट

उरण : जीवन केणी ख्रिसमसच्या सुटीमुळे घारापुरी बेटावर पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून, वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे पर्यटकांना एमटीडीसीमधील उपाहारगृहामध्ये जादा रक्कम आकारूनही योग्य पद्धतीचे अन्न मिळत नसल्याने येणार्‍या पर्यटकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचप्रमाणे घारापुरी बेटावरील टपरीधारक पाण्याच्या बाटल्यांचे अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याने पर्यटकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशाची आर्थिक …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा

सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळा दिनांक 3 व 4 जानेवारी …

Read More »

रूचिता लोंढे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणूक 9 जानेवारीला होणार असून भाजप, आरपीआय व मित्रपक्षाच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना मतदारांचा भरभरून आशीर्वाद मिळत आहे. महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रूचिता यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. या वेळी त्यांनी भारतरत्न डॉ. …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण ; ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकार्‍यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत यासाठी शुक्रवारी (दि. 3) प्रसिद्ध सनदी लेखापाल माजी खासदार किरीट …

Read More »

पनवेल पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला

देवकीबाई कातकरी सभापतिपदी विराजमान पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या सभापतिपदी भारतीय जनता पक्षाच्या देवकीबाई लक्ष्मण कातकरी बिनविरोध निवडून आल्या असून, यानिमित्ताने येथील पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. पनवेल पंचायत समितीच्या सभापतिपद निवडणुकीसाठी भाजपच्या देवकीबाई कातकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. 30) तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तसेच जिल्हा …

Read More »

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या नायजेरीयन नागरिकांना अटक

पनवेल : वार्ताहर खारघर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरीयन नागरिकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.  अमली पदार्थ विरोधी पथकाने या दोघांजवळ असलेले तब्बल 15 लाख 15 हजार रुपये किंमतीचे एम्फेटामाइन पावडरसह मॅसेक्लीन पावडर व एमडीएमएच्या गोळ्या असा अमली पदार्थ जप्त केला आहे. खारघर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते युवा महोत्सवात बक्षीस वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान, युवा गु्रपच्या वतीने ‘युवा महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि.29) झाला. सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. पनवेल शहरातील महोत्सव शहरातील वरदविनायक सोसायटी …

Read More »

थर्टी फर्स्टसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

पनवेल : रामप्रहर वृत्त नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे शहरात महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात येणार असून, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवायांवरही अधिक भर दिला जाणार आहे. तर शासन निर्णयानुसार नववर्षाच्या पहाटेपर्यंत ऑकेस्ट्रा, हॉटेल व बार खुले ठेवण्यास अनुमती असून, त्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सरत्या वर्षाला निरोप …

Read More »