उरण पूर्व भागात हातातोंडाशी आलेला घास फुकट जात असल्याने उपासमारीची वेळ; आमदार महेश बालदी यांच्याकडे मांडली शेतकर्यांनी कैफियत उरण : रामप्रहर वृत्त खोपटा तर ते काशेखार मार्गे गोवठणे या संपूर्ण सागरी किनार्यावरील समुद्री बांधाना ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे या भागातील पांरांगीखार, ववली भेंडी, रेवचावला आदी खाड्या गेली अनेक वर्षे …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण, विवेक पाटील व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; तत्काळ चौकशी करून कारवाई करणार -पोलीस आयुक्त
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा व अफरातफरीप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील आणि संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची बुधवारी (दि. 22) भेट घेऊन …
Read More »आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी! आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेल मनपा कर्मचार्यांना ग्वाही; लाँग मार्चला पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त आपण सारे जण पनवेल महापालिका झाल्यापासून आपला परिसर स्वच्छ असावा, पालिकेचा परिसर स्वच्छ असावा यासाठी धडपडत असताना तुम्हाला आपल्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे यासारखे दुर्दैव नाही. तुम्ही उभारलेला लढा योग्य असून, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील गीतगंधाली
‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थापक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत आणि संभाजी पाटील प्रस्तुत गीतगंधाली संगीतमय कार्यक्रम मंगळवारी (दि. 21) रंगला. ‘रयत’च्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर …
Read More »युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित
पनवेल ः खोपोली येथील कृष्णा साळुंखे यांनी 2020 सालची युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस पनवेल ः भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात …
Read More »क्रांतिवीर महोत्सवाचा शानदार समारोप
पनवेल ः प्रतिनिधी क्रांतिवीर प्रतिष्ठान शिरढोण व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्था शिरढोण यांच्या वतीने क्रांतिवीर महोत्सवाचे शिरढोण येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सोमवारी (दि. 20) समारोप झाला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे पहिल्यांदाच क्रांतिवीर महोत्सव आयोजित …
Read More »महासंचालकपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे रुजू
मुंबई : प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ. दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी (दि. 21) पदभार स्वीकारला. पांढरपट्टे यांची 1987मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली. 2000मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. 27 मार्च 2015 साली त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात येऊन त्यांचा समावेश 2004च्या …
Read More »बदलापूर-पनवेल एसटी बस फेर्यांत वाढ
पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामधून बदलापूर-पनवेल-बदलापूर प्रवासी बस फेर्या चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे तूर्त बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवासी बांधवांच्या सततच्या मागणीमुळे प्रवासी संघ पनवेल, बदलापूर यांच्या माध्यमाद्वारे ठाणे विभाग नियंत्रक जी. डी. कबाडे व विठ्ठलवाडी आगारप्रमुख शेळके व त्यांचे वाहतूक खात्याचे सहकारी अधिकारी बदलापूर डेपो, विठ्ठलवाडी …
Read More »तीन पायांची अभद्र आघाडी टिकेल का?
एकनाथ खडसे यांचा उपरोधिक सवाल पंढरपूर ः प्रतिनिधी वर्षानुवर्षांची आपली विचारधारा, तत्त्वे बाजूला सारून सत्तेसाठी राज्यात अभद्र आघाडी झाली असून, ही तीन पायांची आघाडी महाराष्ट्राला एका दिशेला नेईल असे वाटत नाही, असा घणाघात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला. तसेच ही तीन पायांची अभद्र आघाडी टिकेल का, असा उपरोधिक सवालही …
Read More »उरणमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची रंगत
उरण : वार्ताहर उरण नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आंतरशालेय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन मंगळवारी (दि. 21) नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले. पालिकेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेच्या मैदानावर हा तीनदिवसीय महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शिक्षण सभापती रवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper